By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 18:27 IST
1 / 5डेंग्यू मलेरियाचे डास सध्या प्रचंड हैदोस घालत असून अनेकांना त्यामुळे आजारांची लागण झाली आहे. परंतु आज आम्ही काही असे घरगुती उपाय सांगणारा आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही डासांपासून स्वतःचा बचाव करू शकता. 2 / 5कडुलिंबाते तेल फक्त डासांपासून बचाव करण्यासाठीच नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी लाभदायक असतं. नारळाच्या तेलामध्ये कडुलिंबाचं तेल मिक्स करून त्याचा वापर केल्यानं डासांपासून बचाव करण्यासाठी उपयोग होतो. 3 / 5डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही लिंबाचं तेल आणि निलगिरीचे तेल एकत्र करून वापरू शकता. 4 / 5कापूर डासांना पळवून लावण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. कापूर एका खोलीमध्ये जाळून दरवाजे खिडक्या बंद करून ठेवा. असं केल्याने डास घरामध्ये येणार नाही. 5 / 5तुळशीची पानं, पुदीना, झेंडूची फुलं, लिंबू, कडुलिंब हे डास पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतात.