शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

FIFA Under-17 World : यंग इंडियाचे पाच शिलेदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 11:37 PM

1 / 5
17 वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत यंग इंडियाची मोहीम सोमवारपासून (दि. ९) सुरू होईल. भारतीय संघातील पाच खेळाडू मुख्य मानले जात असून त्यांच्यावर बरीच भिस्त असेल.यामध्ये अमरजीत सिंग कियाम... अमरजीत हा मूळचा मणिपुरी असणारा हा खेळाडू चंदिगड अकादमीतून खेळत राष्ट्रीय स्तरावर पोहचला.
2 / 5
अनिकेत जाधव : कोल्हापूरच्या (महाराष्ट्र) या खेळाडूने १६ वर्षांखालील एएफसी चषकात लक्ष वेधले होते. त्या वेळीच त्याने विश्वचषकासाठी आपली ‘सीट’ बुक केली होती. १४ वर्षांचा असतानाच त्याने एफसी बेयर्न म्युनिच युथ चषकात भारताचे प्रतिनिधीत्व केले. हा एक उत्तम स्ट्रायकर.
3 / 5
कोमल थटाल : सिक्कीमसारख्या दुर्गम भागात जन्मलेला हा खेळाडू कष्टाळू. भारतीय संघाचा ‘चीफ प्लेमेकर’ म्हणून याच्याकडे पाहिले जात आहे. ब्राझील आणि उरुग्वे संघाविरुद्ध गोल नोंदवणारा हा एकमेव खेळाडू आहे. १६ वर्षांखालील एएफसी चषकात कोमलची चर्चा अधिक होती. अत्यंत जिद्दी, वेगवान आणि चपळता ही कोमलची खासियत आहे.
4 / 5
संजीव स्टॅलीन : संघाचा ‘बॅकबोन’ खेळाडू म्हणून ओळख.संपूर्ण मैदानात खेळण्यास सक्षम. बंगळुरूत जन्मलेल्या या खेळाडूचे पाय मजबूत आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला चकवा देत चेंडू आपल्या ताब्यात घेण्याची कला याला चांगलीच अवगत आहे. त्यामुळे स्ट्रायकर्सला संधी मिळवून देण्यात याचा वाटा अधिक असेल.
5 / 5
अन्वर अली : एप्रिल २०१७ मध्ये हा भारतीय संघात सामील झाला. मार्चमध्ये झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय संघाला मिनर्वा क्लबने एकमेव गोलने पराभूत केले होते. त्या वेळी मातोस यांची नजर अन्वर अलीवर पडली. माजी प्रशिक्षक निकोल अॅडम यांनीही अन्वरची शिफारस केली होती.
टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल