Photo : विराट, रोहित यांच्या मुंबईतील घराच्या किंमतीत ख्रिस्तियानो रोनाल्डो विकतोय मँचेस्टर येथील वाडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 18:39 IST
1 / 10पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं मँचेस्टर युनायटेड क्लब सोडून दशक ओलांडून गेलं. त्यामुळेच आता रोनाल्डो मँचेस्टरशी असलेलं नातं तोडून पुढे निघून जाईल यात शंकाच नाही.2 / 10२००७ मध्ये रोनाल्डोनं मँचेस्टर येथे भव्य वाडा खरेदी केला होता. तीन मजली वाड्यात पाच बेडरुम्स, स्वीमिंग पूल, घराबाहेर हिरवळ... आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा वाडा त्याच्या क्लबच्या मैदानापासून ( ओल्ड ट्रॅफर्ड) येथून २४ किलोमीटर अंतरावर आहे.3 / 10३३ वर्षीय रोनाल्डो आता इटालियन क्लब युव्हेंटसकडून खेळतो आणि तो आता इंग्लिश प्रीमिअर लीगमधील युनायटेड क्लबसोबत पुन्हा करार करेल अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे रोनाल्डोनं मँचेस्टर येथील वाडा विक्रीस काढला आहे.4 / 10रोनाल्डोनं २००७मध्ये £3.895 million म्हणजेच ४० कोटी, ०४ लाख ८४,९११ रुपये या किमतीत हा वाडा खरेदी केला होता अन् आता तो सहा कोटींचं नुकसान सहन करून £3.25 million ला म्हणजेच ३३ कोटी, ४१ लाख ५९,८७८ रुपयांना विकण्यास तयार आहे.5 / 10 या वाड्यात आलिशान सुखसुविधा आहेत, स्वीमिंग पूल, स्टीम रूम, सिनेमा रुम आणि जिम हेही आहे. 6 / 10टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मुंबईतील घर यापेक्षा अधिक महाग आहेत.7 / 10टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मुंबईतील घर यापेक्षा अधिक महाग आहेत.8 / 10टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मुंबईतील घर यापेक्षा अधिक महाग आहेत.9 / 10टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मुंबईतील घर यापेक्षा अधिक महाग आहेत.10 / 10टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मुंबईतील घर यापेक्षा अधिक महाग आहेत.