स्टीलच्या भांड्यांमध्ये ठेवताच विष बनतात हे पदार्थ, कधीही करू नका अशी चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:56 IST
1 / 5स्टीलची भांडी ही आता प्रत्येक घरातील किचनमधील सर्वसामान्य वस्तू बनली आहे. अगदी स्टीलच्या डब्यांपासून ते पातेल्यांपर्यंत स्टीलच्या अनेक वस्तूंचा वापर दररोजचा स्वयंपाक बनवताना होतो. स्टीलच्या भांड्यामध्ये स्वयंपाकाचे अनेक पदार्थही साठवून ठेवले जातात. मात्र काही अन्नपदार्थांची स्टीलच्या भांड्यांसोबत रासायनिक अभिक्रिया होऊन त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अशा पदार्थांची माहिती पुढील प्रमाणे. 2 / 5लोणचे हे अॅसिडिट प्रकृतीचे असते. त्यामुळे स्टीलसोबत त्याची लवकर रासाययनिक अभिक्रिया होते.त्यामुळे त्याची चव बदलू शकते. तसेच ते लवकर खराबही होऊ शकते. त्यामुळे लोणचे हे स्टीलच्या भांड्याऐवजी काचेच्या बरणीत ठेवणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. 3 / 5टोमॅटोपासून बनवलेला कुठलाही पदार्थ स्टीलच्या भांड्यात ठेवणं सहसा टाळलं पाहिजे. टोमॅटोपासून बनवलेला कुठलाही पदार्थ स्टीलच्या भांड्यासोबत अभिक्रिया घडवून आणू शकतो. त्यामुळे असा पदार्थ सेवन केल्यावर तुमची प्रकृती बिघडू शकते. 4 / 5शक्यतो दहीसुद्धा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवता कामा नये. दही हे अॅसिडिक प्रकृतीचे असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा दही स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवता तेव्हा ते रिअॅक्ट करते. त्यामुळे त्याची चव बिघडू शकते. त्यामुळे दही ठेवण्यासाठी सुद्धा शक्यतो काचेच्या भांड्याचा वापर केला पाहिजे. 5 / 5याशिवाय फळांपासून बनवलेले सलाड ठेवण्यासाठी स्टीलच्या भांड्यांचा वापर टाळला पाहिजे. स्टीलच्या भांड्यात ठेवल्याने सलाड खराब होऊ शकतं. (टिप -वरील माहिती की केवळ प्राथमिक माहितीच्या आधारावर देण्यात आलेली आहे. )