शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थंडीत संत्री खाणं ठरतं आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 2:46 PM

1 / 8
थंडीच्या दिवसांत संत्री खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, कोलिन, कॅल्शिअम, कॉपर आणि व्हिटॅमिन बी - 1 भरपूर प्रमाणात असतात.
2 / 8
संत्र्यामध्ये कमी कॅलरी आणि हाय फायबर रिच असल्याकारणाने वेट लॉससाठी फायदेशीर ठरतं. तसेच अनेक गुण असल्याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
3 / 8
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट सुद्धा भरपूर प्रमाणात असतात.
4 / 8
संत्र्यामध्ये असलेल्या फॉलिक अ‍ॅसिड किंवा फॉलेट व व्हिटॅमिन बी मेंदूच्या विकासाठी चांगलं असतं. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए चं सुद्धा प्रमाण भरपूर असतं त्यामुळे त्वचा हेल्दी राहते.
5 / 8
व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ने भरपूर असलेल्याने याचा सौंदर्य खुलवण्यासाठी फायदा होतो. अँटी एजिंग गुणांसोबतच यात डाग दूर करण्याचे गुणही आढळतात.
6 / 8
पोषक तत्व असल्याने प्रेग्नेंट महिलांनी संत्री खावीत. याने गर्भात असलेल्या बाळाचा विकास चांगला असतो. सोबतच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याचा धोकाही वाढतो.
7 / 8
संत्री डोळ्याच्या म्यूकस मेम्ब्रेन्सला हेल्दी करतात. याने मेक्यूलर डिजनरेशनपासून डोळ्यांचा बचाव होतो. मेक्यूलर डिजनरेशन डोळ्यांच्या दृष्टीशी संबंधित एक समस्या आहे.
8 / 8
संत्र्याचा ज्यूस देखील शरीरासाठी उत्तम असतो. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
टॅग्स :foodअन्नfruitsफळे