शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कॉफीचे विविध प्रकार तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 7:47 PM

1 / 6
कॉफी हे तुमच्यापैकी बहुतेकांचे आवडते पेय असेल. पण या कॉफीचे विविध प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? आज जाणून घेऊया कॉफीच्या विविध प्रकारांविषयी
2 / 6
दक्षिण भारतातील प्रसिद्ध फिल्टर कॉफीविषयी सर्वांनाच माहिती आहे. खूप पाणी, थोडेसे दूध आणि टाकून चहाप्रमाणे ही कॉफी तयार केली जाते. मात्र पाश्चिमात्य देशात कॉफी दूध टाकून तयार केली जात नाही.
3 / 6
यामध्ये कॉफी आणि पाण्याशिवाय अन्य कुठलाही पदार्थ मिसळला जात नाही. मात्र ही कॉफी बनवण्यासाठी एस्प्रेसो मशीनची गरज भासते.
4 / 6
एस्प्रेसो कॉफीमध्ये दूध आणि भरपूर फोम टाकला की कॅपुचिनो कॉफी तयार होते.
5 / 6
कॅपुचिनो कॉफीमध्ये थोडेसे दूध मिसळल्यावर लाटे कॉफी तयार होते. इटालियन भाषेत दुधाचा अर्थ लाटे असा होतो.
6 / 6
लाटे आणि माकियाटो कॉफीमधील फरक हा केवळ कलेचा आहे. लाटेमध्ये एस्प्रेसोवर दूध टाकून ते चमच्याने ढवळले जाते. तर माकियाटोमध्ये दुधाच्या ग्लासात एस्प्रेसो हळुहळू सोडली जाते.
टॅग्स :foodअन्न