शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाकून देताय शिळी पोळी? फायदे वाचा, ठरेल उपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 2:25 PM

1 / 6
शिळं अन्न न खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. शिळं अन्न खाल्ल्यास ऍसिडिटी, अतिसार होण्याचा धोका असतो. पण शिळी पोळी खाणं शरीरासाठी उपयोगी असतं.
2 / 6
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी शिळी पोळी थंड दुधासोबत खाल्ल्यास फायदा होतो. थंड दुधात 10 मिनिटं भिजवून ठेवल्यानंतर पोळी खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.
3 / 6
हाय शुगरचा त्रास असलेल्या व्यक्तींनी शिळी पोळी थंड दुधात 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवावी. त्यानंतर ती खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. दिवसातील कोणत्याही वेळी अशा प्रकारे पोळी खाता येईल.
4 / 6
शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यास शिळ्या पोळीची मदत होते. माणसाच्या शरीराचं तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. ते 40 च्या वर गेल्यास अवयवांना धोका पोहोचू शकतो. अशावेळी थंड दुधात बुडवलेली शिळी पोळी खाल्ल्यास तापमान नियंत्रणात येतं.
5 / 6
सतत पोटाचे त्रास होत असलेल्या व्यक्तीनं शिळी पोळी खाल्ल्यास फायदे होतो. यामुळे बद्धकौष्ठ, ऍसिडिटी, गॅस यासारख्या समस्या दूर होतात. त्यासाठी शिळी पोळी रात्री झोपण्यापूर्वी थंड दूधात बुडवून खावी.
6 / 6
तयार केल्यानंतर 12 ते 15 तासांमध्ये खावी. दुधात अनेक पौष्टिक घटक असल्यानं ती दुधासोबत खावी. त्यामुळे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरते.
टॅग्स :Healthआरोग्य