दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:22 IST
1 / 62 / 6त्यामुळेच दिवाळीमध्ये चहुकडे प्रकाश पसरला असताना चांगले चांगले फोटो काढण्यासाठी अनेक तरुणी उत्सुक असतात. त्यासाठी त्या चांगल्या पोझच्या शोधात असतात. म्हणूनच आज आम्ही दिवाळीसाठीच्या फोटोंसाठी काही खास पोझ सांगणार आहोत. त्या पोझ तुम्ही दिवाळीतील फोटोशूट वेळी ट्राय करू शकता. 3 / 6या दिवाळीत तुम्ही हातात दिव्यांचं ताट घेऊन अशा प्रकारे फोटोशूट करून शकता. दिव्यांचा सौम्य प्रकाश तुमच्या चेहऱ्यावरचं सौंदर्यं अधिकच उजळवेल, त्यामुळे हा फोटो अगदी खास ठरू शकतो. 4 / 6रांगोळी काढतानाचा कँडिड फोटोही तुम्ही या दिवाळीनिमित्त काढू शकता. अशा प्रकारच्या पोझ कधीही आऊट ऑफ फॅशन होऊ शकत नाहीत. तुम्ही रांगोळी जवळ बसून चांगली पोझही देऊ शकता. 5 / 6 याशिवाय हातात लायटिंगची माळ पकडून तुम्ही अशा प्रकारे सुंदर फोटोशूट करू शकता. या चमचमत्या लाईटमध्ये तुमच्या चेहऱ्यावरची चमक फोटोमध्ये अधिकच सुंदर दिसू शकते. तसेच अशा प्रकारची पोझ ही सोशल मीडिया पोस्टसाठी अगदी परफेक्ट ठरू शकते. 6 / 6याबरोबरच हातात फुलबाजा घेऊन तुम्ही अशा प्रकार पोझ देऊ शकता. अशी पोझ सोशल मीडियावर खूप ट्रेंडिग ठरू शकते. हल्लीच्या तरुणाईमध्ये ही पोझ खूप फेमस झालेली आहे.