शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 10:43 AM

1 / 7
व्याघ्र दिनानिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात साकारलेल्या विशेष जंगलात विहार करणाऱ्या ‘शक्ती’ वाघाच्या लीलांचे लाईव्ह दर्शन बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांना घडविण्यात आले.
2 / 7
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन असल्याने राणीच्या बागेतही पर्यटकांना येण्यास मनाई आहे. मात्र व्याघ्र दिनानिमित्त या रुबाबदार प्राण्याचे दर्शन मुंबईकरांना व्हावे, यासाठी महापालिकेने सोशल मीडियाचा आधार घेतला.
3 / 7
झाडावर लटकलेली शिकार पाहून शक्तीने आपली नखे झाडावर घासून टोकदार केली. जंगलातील हालचालींचा कानोसा घेत त्याने झाडाच्या फांदीवर लटकवलेल्या मांसावर झडप घातली आणि आपले भक्ष्य गुहेकडे नेत त्याने यथेच्छ ताव मारला.
4 / 7
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद येथील प्राणिसंग्रहालयातून शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडी राणीबागेत आणण्यात आली. या आक्रमक आणि रुबाबदार प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी विशेष व्यवस्था राणीबागेत करण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयात वाघांसाठी रनथंबोर येथील जोगी महलची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या जंगलात तीन वर्षांच्या शक्तीने मनसोक्त विहार केला.
5 / 7
वाघांना बांबूची झाडे आवडत असल्याने येथे तयार केलेल्या जंगलात बांबूचे गवत लावण्यात आले आहे. जंगलासारखे वातावरण तसेच कृत्रिम तलावाची निर्मितीही येथे करण्यात आली आहे. त्यामुळे शक्तीसाठी आजचा दिवस विशेष ठरला. बुधवारी दुपारी ४.३० वाजता सोशल नेटवर्क साइट्सद्वारे मुंबईकरांची शक्तीशी भेटही झाली.
6 / 7

7 / 7

टॅग्स :TigerवाघMumbaiमुंबईenvironmentपर्यावरण