शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'पावसाळ्यात धाडस, मोहीमही फत्ते'; दुर्गम लिंगाणा सर करून फडकवला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 6:26 PM

1 / 8
रायगडचा उपदुर्ग असलेला लिंगाणा हा अतिशय दुर्गम व तीन हजार फुटांपेक्षा अधिक उंचीचा हा सुळका कठीण खडकाळ असाच.
2 / 8
महाडपासून काही अंतरावर असलेल्या अरूंद वाटाच्या अन् विविध घाटांच्या या दुर्गम भागातील लिंगाणा हा दुर्ग सर करणे, ते ही पावसाच्या धारा कोसळत असताना महत्कठीणच.
3 / 8
अशा या खडतर मोहीमेची आखणी शिलेदार गिर्यारोहक संस्थेने केली. स्वातंत्र्यदिनी लिंगाणा सर करायचा अन् तेथे तिरंगा फडकावयचा, असा दृढनिश्चय केला.
4 / 8
शिलेदारचे संस्थापक सागर नलावडे, प्रविण परब, अनिकेत जाधव, सागर मोहिते, शैलैश जाधव, मोनिष येनपुरे, कविता जाधव, शीतल जाधव, अमिता सालीयन, विनायक पुरी, प्रशांत सूर्यवंशी, प्रितेश गुडेकर या विविध भागातील गिर्यारोहकांसह कळंब येथील शुभम राखुंडे हा तरूणही यात सहभागी झाला होता.
5 / 8
सागर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली या टिमने १४ ऑगस्ट रोजी लिंगान्यालगतच्या मोहरी गावात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लिंगाण्याची वाट धरली.
6 / 8
यासाठी कठीण अशा बोराट्याची नाळ या अरूंद, घसरण असलेल्या घाटातून मार्गस्थ होत, एकमेकांचा आधार बनत सुळका सर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुर्गम लिंगाणा सर करत त्याठिकाणी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ७५ फुट रूंदीचा तिरंगा दिमाखात फडकवला.
7 / 8
उंचच्या उंच सुळका, त्याची खडकाळ अन् निसरडी वाट, नाळेत खळाळणारे पाणी, जागोजागची घसरण, धुक्याचे सावट अन् बरसणाऱ्या धारा यामुळे पावसाळ्यात लिंगाणा सर करणे कठीणच असते, असे शुभम राखुंडे यांनी सांगितले.
8 / 8
आम्ही सर्वानी एकमेकांना आधार देत, काळजी घेत ही मोहीम पावसाळ्यातच फत्ते केली असेही राखुंडे यांनी सांगितले. या मोहिमेस पायथ्यावरून रजनीकांत जाधव यांनी योग्य बॅकअप दिले. ( फोटो सौजन्य : किरण हंसकर )
टॅग्स :Trekkingट्रेकिंगOsmanabadउस्मानाबाद