By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 11:00 IST
1 / 7बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात एका महिलेने पतीच्या अनैतिक संबंधांना आणि त्याच्या त्रासाला कंटाळून मृत्यूला कवटाळला. विष खाण्याआधी महिलेने एका व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि म्हणाली की, 'मी जात आहे. तुम्ही आनंदी रहा. फक्त, माझ्यासारखं आणखी कुणाला फसवू नका. मी तुमच्यावर खूप प्रेम केलं'. महिलेला काही दिवसांआधी पतीचा एक पेनड्राइव सापडला होता. ज्यात त्याने अनेक महिलांसोबत अश्लील व्हिडीओ होते. पीडितेच्या परिवाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.2 / 7अजमतचं लग्न गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात जाहिर जावेद नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. पती जावेद मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये सिव्हिल इंजिनिअर आहे. मृत महिलेच्या वडिलांनी सांगितलं की, लग्नानंतर मुलीला पतीच्या अनैतिक संबंधांबाबत समजलं होतं.3 / 7त्यानंतर तिने पतीवर नजर ठेवली. तेव्हाच तिला पतीचा एक पेनड्राइव सापडला. यात अनेक महिलांसोबत त्याचे अश्लील व्हिडीओ होते. याचा विरोध केला तर त्याने तिला मारहाण सुरू केली. ही घटना समोर आली तेव्हा माहेरच्या लोकांनी दोघांना समजावून सांगत वाद शांत केला होता.4 / 7रविवारी दुपारी महिला आपल्या माहेरी होती. तिने तिच्या आई-वडिलांना एटीएमवर पैसे काढण्यासाठी पाठवलं. परत आले तेव्हा त्यांना मुलगी घरात पडलेली दिसली, तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे तिचा मृत्यू झाला.5 / 7वडिलांनी सांगितलं की, लग्नानंतर जावई मुलीला सासरी घेऊन गेला नाही. तिला गरम चौकातील एका भाड्याच्या घरात ठेवलं होतं. म्हणाला होता की, तो भोपाळमध्ये नोकरी करतो. पण तो बऱ्याच दिवसांपासून इथेच होता. त्याने मुलीचं व्हॉट्सअॅपही हॅक केलं होतं. जेव्हाही मुलगी काही सांगत होतं ते त्याला समजतं होतं. त्यानंतर तो मुलीसोबत मारहाण करत होता.6 / 7आत्महत्येआधी अजमतने एक व्हिडीओ बनवला. यात तिच्या हातात विषाचं पाकिटही दिसत आहे आणि ती म्हणाली की, 'तुम्हाला हेच हवं होतं ना...मी जात आहे. तुम्ही आनंदी रहा. फक्त माझ्यासारखं दुसऱ्या कुणाला फसवू नका. मी तुमच्यावर खूप प्रेम केलं. सगळ्यांनी मिळून मला फसवलं. पण मी तुमच्यावर खरं प्रेम केलं. आता मी जात आहे. तुम्ही आनंदी रहा'. 7 / 7याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, मृत महिला शिक्षिका होती. तिने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. कुटुंबियांच्या तक्रारीवरन गुन्हा दाखल करून घेतला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.