By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 19:38 IST
1 / 10Satish Kaushik Death: अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी आता नवीन खुलासा झाला आहे. या प्रकरणात उद्योगपती विकास मालू यांचे नाव समोर येत आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे. अभिनेते सतीश कौशिक यांचे विकास मालू यांच्याशी काय नाते होते? दोघांमध्ये व्यावसायिक संबंध होते का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.2 / 10विकास मालू आणि सतीश कौशिक अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत होते. आता विकास मालू यांच्या पत्नीने सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात पतीवर कट रचल्याचा संशय व्यक्त केला आहे. व्यवसायासाठी विकास मालू यांनी सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रुपये उसने घेतल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांना परत करायची नाही, म्हणून कटाचा एक भाग म्हणून त्याने कौशिकची हत्या केल्याचा आरोप केला आहे.3 / 10विकास मालू हे कुबेर ग्रुपचे मालक आहेत. त्यांचे वडील मूलचंद मालू यांनी १९८५ मध्ये कुबेर खैनी यांच्यासोबत हा ग्रुप सुरू केला. १९९३ मध्ये विकास मालू या ग्रुपचे संचालक झाले. कुबेर ग्रुपचा व्यवसाय ५० देशांमध्ये पसरला आहे.4 / 10कुबेर ग्रुप हे सर्व प्रकारचे पान मसाले, माउथ फ्रेशनर, सुगंध, खाण्यायोग्य आणि अखाद्य तेले इत्यादींच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू हे त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त बॉलिवूड स्टार्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्यांचे अनेक स्टार्ससोबतचे फोटो आणि व्हिडिओ आहेत.5 / 10Satish Kaushik Death: विकास मालूवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विकास मालूचे वैयक्तिक आयुष्यही खूप गुंतागुंतीचे आहे. बलात्कारानंतर विकास मालूने बळजबरीने लग्न केल्याचा आरोप त्याच्या दुसऱ्या पत्नीने केला आहे. पत्नीने पती विकास मालूविरुद्ध बलात्काराचा एफआयआर दाखल केला असून, याची चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून विकास मालू हा अनेकदा दुबईत राहतो. होळी पार्टीसाठी ते दिल्लीत आले होते.6 / 10गुटखा किंगच्या पार्टीत सतीश कौशिक आले होते. होळीच्या दिवशी मुंबईहून आलेले अभिनेते सतीश कौशिक यांनी दिल्लीतील विकास मालू यांच्या फार्महाऊसवर दुपारी आयोजित केलेल्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत गुटखा किंग विकास मालूसह अनेक बडे बिल्डर्सही उपस्थित होते. सतीश आणि विकास यांच्यात गेल्या ३० वर्षांपासून घट्ट मैत्री होती. दोघेही मित्र एकमेकांच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे.7 / 10अभिनेते सतीश कौशिक त्यांचा मित्र विकास मालूच्या घरी ए-5 पुष्पांजली येथे राहत होते. पार्टीच्या रात्री, सतीश यांच्या छातीत दुखू लागले यामुळे त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने सतीश यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.8 / 10Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर विकास मालूच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या पत्राने या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण दिले आहे. कारण सतीश कौशिक यांना चुकीचे औषध पाजल्यासारखे गंभीर आरोप महिलेने पती विकासवर केले आहेत.9 / 10तक्रारीनुसार, विकास आणि सतीश यांच्यात १५ कोटी रुपयांच्या कर्जावरून भांडण झाले होते. यामुळे महिलेने संशय व्यक्त करत विकासने सतीश कौशिक यांना पैसे द्यावे लागू नयेत म्हणून चुकीचे औषध पाजले असावे, असं तक्रारीत म्हटले आहे.10 / 10Satish Kaushik Death: आता प्रश्न उपस्थित होत आहे की सतीश कौशिक हे त्यांचे थकीत पैसे घेण्यासाठी गेले होते की फक्त होळीच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी आले होते. १५ कोटींचे कर्ज, सतीश कौशिक आणि विकास मालू यांच्यातील व्यावसायिक संबंध आणि पत्नीचे आरोप याबाबत पोलीस आता नव्याने तपास करत आहेत.