रेणू शर्मा कोण?, जिने धनंजय मुंडेंकडे मागितली ५ कोटींची खंडणी अन् गेली जेलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 20:42 IST
1 / 6रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने सदर तक्रार माघारी घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही मेसेज, व्हॉट्स अॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती, यासंदर्भातील सर्व पुरावे पोलिसात दिले असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 2 / 6 रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्मा यांची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी इंदोर कोर्टात हजर केले, इंदोर कोर्टाने तिचा ताबा पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडे दिला. 3 / 6 करुणा शर्मा या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी आहेत. त्यांच्यातील घटस्फोट प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. करुणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा. 4 / 6 रेणू शर्मा ही गायक असल्याचंही सांगितलं जातं. देसी लव्ह, बैशरम, फुलों तरह खिलते देखा, मी आहे तुझ्या व्हॉट्सअपवर ही गाणी रेणू शर्मान गायली आहे.5 / 6 टिफाचा बेस्ट प्ले बँक सिंगर आणि लान्स गोल्ड अवॉर्डही रेणू शर्माला मिळाला आहे. 6 / 62021 मध्ये धनंजय मुडेविरोधात या महिलेनं बलात्कार केल्याची तक्रार दिली आणि नंतर ही तक्रार मागेही घेतली होती