By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 12:25 IST
1 / 10उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून पवित्र नात्याला काळिमा फासणारी आणि निर्दयीपणे हत्या करण्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 2 / 10आरोप आहे की, इथे एका काकाने विवाहित पुतणीवर दगा दिल्याचा आरोप लावत तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 3 / 10बुलंदशहरच्या शिकारपूर पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याची चौकशी केली जात आहे.4 / 10पोलिसांनुसार, माथेफिरूने घरात घुसून चाकूने पुतणीवर हल्ला (Uncle Attacked Niece After Infidelity In Love) केला. 5 / 10दरम्यान पीडिता गंभीरपणे जखमी झाली. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तिचा जीव वाचवता आला नाही. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.6 / 10बुलंदशहर एसपींनी सांगितले की, डिबाई परिसरात राहणाऱ्या एका तरूणाचं चुलत पुतणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. १४ फेब्रुवारी २०२१ ला आरोपी काका आणि पीडित विवाहित पुतणी घरातून पळून गेले होते. 7 / 10त्यानंतर दोघांच्याही कुटुंबिांनी त्यांना बैठक बोलवून समजावून सांगितले होते. त्यावेळी महिलेने कुटुंबियांचं ऐकलं. त्यानंतर ती तिच्या सासरी परत गेली.8 / 10पण आरोपी तरूणाला हे मान्य नव्हतं. त्याला तिचं परत जाणं सहन झालं नाही. त्याने पुतणीवर दगा दिल्याचा आरोप केला. त्यानंतर तो तिच्या सासरी गेला आणि तिच्या घरासमोर जोरजोरात तिला आवाज देऊ लागला.9 / 10काहीतरी गोंधळ झाल्याने पीडितेच्या सासरची मंडळी बाहेर आली. त्यांनी तरूणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावर तो त्यांना म्हणाला की, तिने त्याला प्रेमात दगा दिला. तो याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. 10 / 10नंतर तरूण महिलेच्या खोलीत गेला आणि त्याने चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.