शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तांत्रिकाने केला प्रेमी युगलाचा मर्डर, आधी दोघांना नग्नावस्थेत फेविक्विकने चिटकवलं मग केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:32 IST

1 / 6
राजस्थानच्या उदयपूरमध्ये प्रेमी युगलाच्या मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. ही घटना ना ऑनर किलिंगची आहे ना प्रेम प्रकरणाऱ्या द्वेषातून. हा प्लान एका तांत्रिकाचा होता. पोलिसांनी या केसचा खुलासा करत आरोपी भालेश जोशीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्रेमी युगुल तांत्रिकाच्या संपर्कात होतं. तांत्रिकाने तरूणाच्या पत्नीला त्याच्या प्रेयसीबाबत आणि संबंधांबाबत सांगितलं होतं. त्यामुळे हे कपल तांत्रिकावर नाराज होतं. त्यांनी तांत्रिकाला बदनाम करण्याची धमकी दिली होती. यालाच घाबरून तांत्रिकाने प्लान करून दोघांना जंगलात नेलं त्यांना फेविक्विकने एकत्र चिकटवलं आणि नंतर चाकूने वार करत हत्या केली.
2 / 6
पोलिसांनुसार, भागातील उबेश्वर महादेव मंदिराजवळील जंगलात तीन दिवसांआधी प्रेमी युगुलाचे मृतदेह नग्नावस्थेत आढळून आले होते. तांत्रिकाला अटक करून चौकशी करण्यात आली. त्याने धक्कादायक खुलासा केला. तांत्रिक भालेश जोशीने या कपलची हत्या तेव्हा केली जेव्हा दोघे शारीरिक संबंध ठेवत होते. तांत्रिक भालेश जोशीने सांगितलं की, दोघेही त्याला बदनाम करण्यासाठी प्लॅकमेल करत होते. त्यामुळे त्याने हे कृत्य केलं.
3 / 6
दरम्यान तांत्रिकाने हत्या केलेला तरूण राहुल मीणा आणि तरूणी सोनू कंवरचा परिवार आधीपासून तांत्रिकाच्या संपर्कात होते. हे दोघेही तांत्रिकाच्या माध्यमातूनच संपर्कात आले होते. दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी नंतर संबंध ठेवणं सुरू केलं. अशात तांत्रिकाने राहुलचं हे गुपित त्याच्या पत्नीला सांगितलं होतं. ज्यामुळे कपल नाराज झालं होतं. तांत्रिकाला त्यांनी बदनाम करण्याची धमकी दिली होती.
4 / 6
तांत्रिक भालेश जोशीला अंदाज होता की, राहुल आणि सोनूने त्याला बदनाम केलं तर त्याचा धंदा बंद होईल. त्यामुळे त्याने दोघांची हत्या करण्याचा प्लान केला. तो बाजारातून मोठ्या प्रमाणात फिविक्विक घेऊन आला. त्यानंतर त्याने दोघांना वेगळं होण्यासाठी आणि आपल्या परिवारावर लक्ष देण्यासाठी तयार केलं. दरम्यान तांत्रिकाने दोघांना शेवटचे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सांगितलं. यासाठी तो दोघांना बाइकवरून जंगलात घेऊन गेला. सोबत फेविक्विकही घेऊन गेला.
5 / 6
प्लाननुसार त्याने दोघांना संबंध ठेवण्यासाठी जंगलात एकटं सोडलं. तो थोडा दूर गेला. दोघे संबंध ठेवत असताना तांत्रिक तिथे आला. त्याने सगळं फेविक्विक दोघांच्या नग्न शरीरावर टाकलं. त्यामुळे दोघेही एकमेकांना चिकटले. तरूण आणि तरूणीने स्वत:ला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला.पण ते वेगळे होऊ शकले नाहीत.
6 / 6
त्यानंतर तांत्रिकाने चाकूने वार करत दोघांची हत्या केली. तांत्रिकाने दोघांचेही चेहरे दगडाने ठेचले होते. जेणेकरून त्यांची ओळख पटू नये. उदयपूर पोलिसांनी भावेश जोशीला तीन दिवसांच्या रिमांडवर पाठवलं आहे. त्याची चौकशी केली जाईल. मृत तरूणीसोबत तांत्रिकही फोनवर बोलत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी