लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
1 / 5दुचाकीवरून होणाऱ्या हिऱ्यांच्या तस्करीचा भांडाफोड पोलिसांनी केला असून, या तस्करांकडून पोलिसांनी सुमाने ४४० हिरे जप्त केले आहेत. या हिऱ्यांची किंमत सुमारे ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हिरे तस्कर स्कूटीवरून हे हिरे छत्तीसगडमधील फिंगेश्वरमार्गे रायपूरला नेत होते. 2 / 5या हिरे तस्करांना पोलिसांनी वाटेत रोखल्यावर ते घाबरले आणि मागे वळून पळण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना पकडून तपासणी केली असता त्यांच्यांकडे तब्बल ४४० हिरे सापडले. एकाच वेळी ४४० हिरे सापडण्याची छत्तीसगडमधील ही पहिलीच वेळ आहे. 3 / 5यापूर्वी गरियाबंद जिल्हा पोलिसांनी गेल्या दीड वर्षांत ७ विविध ठिकाणांवरून ६७२ हिरे जप्त केले होते. आतापर्यंत दीड कोटी मूल्याचे तब्बल ११०० नग हिरे पोलिसांनी जप्त केले आहेत. जिल्ह्यातील मैनपुरी परिसरातील पायलीखंड नावाची हिऱ्याची खाण आहे. तिथून दररोज अवैध खोदकाम करून हिरे काढले जातात. 4 / 5अवैध खाणकाम करणाऱ्यांकडून हे हिरे कमी किमतीत खरेदी केले जातात. त्यानंतर त्यांची मोठ्या शहरांमध्ये विक्री केली जाते. मात्र यावेळी जेवढ्या मोठ्या प्रमाणात हिरे जप्त झाले आहेत. ते पाहून यामागे काही मोठ्या लोकांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 / 5पोलिसांनी दोन तस्करांना अटक केली आहे. आता त्यांच्याकडील मोबाईल कॉल्सची माहिती तपासली जात आहे. आता हे तस्कर खाण क्षेत्रातील कुणाकडून हे हिरे खरेदी करायचे आणि रायपूरमध्ये कुणाला विकायला जात होते, याचा तपास पोलीस करत आहेत.