आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:23 IST
1 / 7सोनम, राजा अन् प्रियकर राज या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. मेघालयात हत्याकरून फेकून दिलेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनमला सोमवारी अटक करण्यात आली. 2 / 7सोनमने आपल्या प्रियकराच्या साथीने राजला पतीला रास्त्यातून हटवण्यासाठी त्याचा जीव घेतला, असा पोलिसांचा दावा आहे. 21 वर्षांचा राज हा सोनम पेक्षा वयाने 3 वर्षांनी लहान आहे. तसेच हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमात होते, असे बोलले जात आहे.3 / 7सोनमच्या नातलगांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर, तिचे स्वप्न एमबीएची पदवी मिळवून कुठेतरी चांगली नोकरी करण्याचे होते. मात्र, आपल्या मुलीने नोकरीसाठी बाहेर जावे हे तिच्या कुटुंबाला मान्य नव्हते. यामुळे, तिला कुटुंबाच्या प्लायवुड व्यवसायात आपल्या भावाला (गोविंद) मदत करण्यास सांगण्यात आले.4 / 7या कंपनीत पाऊल ठेवताच सोनमच्या आयुष्याने नवे वळण घेतले. ज्याचा परिणाम अत्यंत भयंकर झाला. खरे तर, येथेच तिची भेट राजशी झाली, ज्याच्यासाठी तिच्यावर पतीच्या हत्येचा आरोप आहे. 5 / 7सोनमपेक्षा लहान असलेला राज गोविंदचा कर्मचारी होता. तो येथे बिलिंग आणि अकाउंट्सचे काम बघत होता. काम करत असताना सोनम आणि राज यांच्यात चांगली मैत्री होऊ लागली आणि लवकरच ही मैत्री एवढी वाढली की, ती बॉस आणि कर्मचारी, या नात्याच्याही पलीकडे गेली. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 6 / 7त्यांच्या मैत्रीसंदर्भात माहिती असलेल्या काही लोकांच्या मते, सोनम आणि राज यांच्यात सर्व काही सामान्य नाही, असे कुटुंबाच्याही लक्षात आले. दरम्यान, सोनमसाठी मुलाचा शोध सुरू झाला. सोनमची रघुवंशी समाजाच्या पुस्तिकेत नोंदही करण्यात आली. याच वेळी राजासाठीही मुलीचा शोध सुरू होता. दोघेही मांगलिक असल्याने, कुंडली जुळल्या आणि दोन्ही कुटुंबांनी लग्नाला होकार दिला.7 / 7कुटुंबाच्या आग्रहावरून सोनमनेही लग्नाला होकार दिला, असे म्हटले जाते. मात्र ती आतून नाखूश होती. राजाची आई म्हणते, सून त्यांच्यासोबत केवळ ४ दिवस राहिली. यानंतर ती तिच्या माहेरी गेली. पोलिसांचे म्हणणे आहे की, तीने माहेरी गेल्यानंतर, राजच्या सोबतीने राजाचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन आखला.