शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 22:03 IST

1 / 7
पती आरोपीचे नाव भजन सिंग असे असून तो रविवारी कळव्यात आपल्या पत्नीला घेऊन सीएस रुग्णालयात आला होता. तिथे त्याने आपली २३ वर्षीय पत्नी पूजा बाथरूममध्ये पडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आणि पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.
2 / 7
पोलिसांनी रुग्णालयात गेल्यानंतर मृत पूजाच्या शरीरावर जखमांच्या खुणा पाहिल्या. पतीची चौकशी केली असता त्याने काही नीट माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. 
3 / 7
पहाटे चारच्या सुमाराला चौकशीत त्याने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी बाथरूम गेली असता घसरून पडली आणि तिच्या डोळ्यांना जखम झाली. पुढे त्याने सांगितले की, यानंतर तो तिला रुग्णालयात घेऊन आला जिथे त्याला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले.
4 / 7
पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेच्या मृतदेहाची तपासणी केल्यावर शरीरावर जखमांच्या अनेक जखमांच्या खुणा आढळल्या. पोलिसांना भजन सिंगच्या सांगण्यावर संशय आला की तो पूजा बाथरूमममध्ये घसरून पडल्याची खोटी माहिती देत आहे.
5 / 7
पोलिसांनी तपास केला असता कळले की संशयित अनेकदा गुरुद्वारात जात होता. तिथल्या पुजाऱ्याशी बोलल्यानंतर पुन्हा भजन सिंगची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने सर्व हकीकत सांगितली.
6 / 7
त्याने सांगितले की त्याची पत्नी एक वर्षाच्या मुलीला दूध पाजायला नकार द्यायची. त्यामुले त्याने लोखंडी सळीने मारून तिची हत्या केली.
7 / 7
त्याने पुढे सांगितले की, जेव्हा तिने दूध पाजायला नकार दिला तेव्हा दोघांमध्ये यावरून वाद झाला, नंतर त्याने पत्नीची हत्या केली. घटनेचे सत्य समोर आल्यानंतर नारपोली पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली भजन सिंगला अटक केली आहे.
टॅग्स :MurderखूनbhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटक