शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडे पकडून दिल्याचा घेतला बदला; दोन भावांना वाढदिवसाला बोलवून गळा घोटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 17:18 IST

1 / 11
आजकाल कोण कसा बदला घेईल याचा नेम राहिलेला नाही. एखाद्या अवैध कामाची तक्रार केली तर सिस्टिममध्येच एवढे त्यांचे गुप्तहेर आहेत की तक्रारदाराचे नाव गुप्त राहत नाही. यामुळे कुटुंबाला धमक्या, मारहाण हत्या अशा प्रकारचे बदले घेतले जातात.
2 / 11
आजकाल अनेकांच्या डोक्यात राग एवढा भरलेला असतो की 'सरफिऱ्या'सारखे वागतात. गाडी चालविताना जरा जरी चूक झाली, त्याला ओव्हरटेक केली किंवा पुढे जाण्यासाठी त्याच्या पुढे गाडी घातली तरी त्यांचा इगो असा काही हर्ट होतो की सारखा सारखा हॉर्न वाजविणे, लाईट मारत राहणे किंवा गाडी आडवी घालणे असे प्रकार होत असतात.
3 / 11
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्येही असाच प्रकार घडला आहे. यामध्ये हकनाक तक्रार करणारा तरुण आणि त्याच्या भावाला जिवास मुकावे लागले आहे.
4 / 11
बिहारमधील अहियापूर पोलीस ठाणे क्षेत्रात एकाच कुटुंबातीव दोन तरुणांच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. त्यांची एकाच पद्धतीने हत्या करून मृतदेह वेगवेगळ्या भागात टाकण्यात आले होते.
5 / 11
या मृतदेहांची ओळख त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने करता आली. यापैकी एका तरुणाची ओळख त्यांच्या वडिलांनी पटविली. तसेच त्यांच्या भाच्याचा मृतदेहही त्यांनी ओळखला.
6 / 11
दोघांचेही मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत फेकण्यात आले होते. तसेच तारेने त्यांचा गळा आवळण्यात आला होता. संपूर्ण शरीरावर चाकूने गोंदल्याच्या जखमा होत्या.
7 / 11
मृत दीपक आणि राजाला राहुल आणि पंकज यांनी त्यांच्याकडे बर्थडे पार्टीसाठई बोलावले होते. जेव्हा ते दोघेही उशिर झाला तरीही रात्री घरी आले नाहीत, त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्यांना कुठेच ठावठिकाणा लागला नाही.
8 / 11
दीपक, राजा यांचे फोनही बंद लागत होते. तर दुसरीकडे आरोपी पंकज आणि राहुल घरातून गायब होते.
9 / 11
दीपकच्या वडिलांनी सांगितले की, चार महिन्यांपूर्वी राहुल आणि पंकज यांना वेगाने बाईक चालविण्यापासून दीपकने रोखले होते. त्यांचे भांडण झाले होते. पोलिसांतही तक्रार केली होती. पोलिसांनी राहुल याची बाईक उचलून नेली होती.
10 / 11
यावर राहुलने दीपकला ठार मारण्याची धमकी दिली होती. काही दिवसांनी सर्व सामान्य झाले.
11 / 11
पोलीस निरिक्षक सुनिल रजक यांनी सांगितले की, सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह सापडले होते. त्यांची ओळख पटविण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी करण्यात येत आहे.
टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीMurderखून