चालत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; सोशल मीडियावर झालेल्या मित्राने केले दुष्कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 20:21 IST
1 / 7महिलेने १६ ऑगस्ट रोजी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि तिच्या तक्रारीच्या आधारे दोघांना एकाच दिवशी अटक करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.2 / 7गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या बलात्कार पीडितेने सोशल मीडियावर आरोपीशी मैत्री केली होती. 3 / 7मिळालेल्या माहितीनुसार, दोन आरोपी तिला भेटण्यासाठी एका कारमधून गाझियाबादला पोहोचले होते. बऱ्याच संकोचानंतर तिने कारमध्ये प्रवेश केल्याचे पीडितेने सांगितले.4 / 7पीडितेच्या तक्रारीत पीडित महिलेने आरोप केला की, कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने प्रथम तिला मारहाण केली आणि नंतर चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला.5 / 7नंतर, ड्रायव्हरने दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात गाडी थांबवली, तिच्यावर बलात्कार केला आणि तिला तिथे सोडले. नंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.6 / 7 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिला ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात एफआयआर दाखल केला आणि तपास सुरू केला.7 / 7दरम्यान पोलिसांनी जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार पाहिली. यामुळे त्या दोन आरोपींना अटक करण्यात मदत झाली.