शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:09 IST

1 / 9
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. या हत्येतील मुख्य सूत्रधार त्याची पत्नी सोनम हिच असल्याचे समोर आले. दरम्यान, आज बुधवारी सोनमचा भाऊ गोविंद याने राजा रघुवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
2 / 9
गोविंदा याने राजा रघुवंशी यांच्या आईची भेट घेतली. गोविंदने राजाची आई उमा देवी यांच्याजवळ बहीण सोनमच्या कृत्याबद्दल राग व्यक्त केला.
3 / 9
यावेळी गोविंदा याने राजाच्या आईला सांगितले की, सोनमला गाजीपूर येथे फक्त दोन मिनिटांसाठी भेटलो. दरम्यान, गोविंदने त्याची बहीण सोनमला विचारले, 'या हत्येत तुझा हात आहे का?' यावेळी सोनमने नकार दिला. पण नंतर गोविंदने तिला सांगितले की, आकाश राजपूत, विशाल उर्फ ​​विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी आणि राज कुशवाह या तीन मारेकऱ्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे, तेव्हा सोनम खाली पाहू लागली. तेव्हाच तिने गुन्हा कबुल केला.
4 / 9
गोविंद म्हणाला, 'मी तिला लहानपणापासून पाहत आलो आहे. तिने माझ्याकडे ज्या पद्धतीने पाहिले त्यावरून मला कळले की ती हत्येत सहभागी आहे.' रागाच्या भरात गोविंदने सोनमला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला थांबवले.
5 / 9
राजा रघुवंशी याच्या आईने सांगितले की, गोविंदला त्याच्या बहिणीच्या कृत्याचा राग आला आहे, त्याला वाईट वाटत आहे. तो सोनमला शिक्षा देण्यासाठी आमच्यासोबत आहे. गोविंद मंगळवारी आमच्या घरी आला होता.
6 / 9
'आम्ही गोविंदला माफ केले कारण त्याला या कटाची माहिती नव्हती. आता आपण सर्व मिळून सोनम आणि इतर खुन्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करु.', असंही राजाच्या आईने सांगितले.
7 / 9
पोलिसांनी या प्रकरणी ४२ सीसीटीव्ही फुटेज तपासले. रक्ताने माखलेले जॅकेट आणि सोनमचा रेनकोट असे पुरावे सापडले. सोनमने ९ जून रोजी गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले.
8 / 9
इंदोरमध्ये, मृत राजाचे कुटुंब आणि रघुवंशी समुदाय सोनम आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.
9 / 9
गोविंद यांनी खुन्यांना शिक्षा देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल चौकशी करत आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस