1 / 10राजस्थानच्या पालीमध्ये एका पोलिसावरच महिलेची अब्रू लुटल्याचा आरोप लागला आहे. पाली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजयपाल भाकल याने वाद सोडविण्याचा बहाण्याने एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर तिच्यावर बंधक बनवत १९ दिवस बलात्कार करत राहिला. 2 / 10महिलेने कशीबशी तिची सुटका करून घेतली आणि पोलीस ठाणे गाठले. तिने तक्रार केल्याचे कळताच तो फरार झाला. 3 / 10शहरातील हाऊसिंग बोर्डाच्या भागात शेजाऱ्यांबरोबर महिलेचा वाद झाला. याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल अजयपाल भाकलकडे आली. त्याने हा वाद सोडविण्याचे आश्वासन देत महिलेला तेथून घेऊन गेला. 4 / 10या महिलेला तो उदयपूर, माऊंट अबू, सुमेरपूरच्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत तिची इज्जत लुटली. 5 / 10महिलेने सांगितले की या कॉन्स्टेबलने तिला मारहाणही केली आणि अन्य प्रकारचा त्रासही दिला. सुमेरपूरमध्ये तो तिला हॉटेलमध्ये सोडून काही काळासाठी हॉटेलच्या बाहेर गेला, ही संधी पाहून तिने हॉटेलमधून सुटका करून घेत पळ काढला. 6 / 10महिला हॉटेलमधून निघाली ती थेट तेथील पोलिस ठाण्यात पोहोचली. विचारत विचारत तिने पोलीस ठाणे गाठले. एसपी कालूराम रावत यांच्या आदेशाने महिलेची मदत करण्यात आली आणि आरोपी पोलिसाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. 7 / 10महिलेने पोलिसांना सांगितले की, जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यात शेजाऱ्यांसोबत तिचा वाद झाला होता. यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. ड्यूटीवर तैनात असलेला भाकल तिथे आला. यामुळे मदतीच्या बहाण्याने तिच्या कुटुंबाशी त्याचा संपर्क वाढू लागला. 8 / 10११जूनला भाकलने तिला मदतीचे आश्वासन दाखवत फक्त १० मिनिटांत परत येण्याचे सांगत तिला सोबत घेऊन गेला. यानंतर तो तिला घेऊन विविध हॉटेल, शहरांमध्ये जाऊ लागला. या काळात तिच्यावर त्याने बलात्कार केला. 9 / 10पीडितेचे वय केवळ ३० वर्षे आहे, आणि ती एका मुलाची आई आहे. एसपी कालुराम यांनी सांगितले की, आरोपी कॉन्स्टेबल ड्यूटीवर येत नव्हता. तो दांड्या मारत होता. 10 / 10अजयपालची पहिलीच पोस्टिंग पाली जिल्ह्यात १८ डिसेंबर २०१५ ला झाली होती. १९ मे पासून तो कामावर न सांगताच येत नव्हता. आरोपीला पोलिसांनी शोधून अटक केली आहे.