शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चुकूनही अशा लिंकवर क्लिक करु नका, नाहीतर बसेल मोठा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 2:34 PM

1 / 5
राजधानी दिल्लीत एका युवकाची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या युवकाने आपली दुचाकी विकण्यासाठी ऑनलाइन पोर्टलचा सहारा घेतला. यावेळी या पोर्टलच्या माध्यामातून ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी एक लिंक आली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले. रॉबिन मेहता असे या युवकाचे नाव आहे.
2 / 5
यासंबंधीची तक्रार रॉबिनने केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी दुचाकी विकण्यासाठी ऑनलाइन पोर्टल पाहिले. त्यानंतर 31 मार्चला सकाळी एका व्यक्तीचा फोन आला. त्याने आपल्याला दुचाकी पसंत असल्याचे सांगत खरेदी करणार असल्याचे सांगितले.
3 / 5
फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने रॉबिन याला ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून पेमेंट करेन असे सांगितले. त्यानंतर त्याने एक लिंक शेअर केली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अकाऊंटवर पैसे जमा झाले नाहीत, तर अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले. यानंतर थोड्यावेळाने पुन्हा त्याचा फोन आला आणि सांगितले की तुमच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले आहेत. ते परत करण्यासाठी एटीएम कार्डचा फोटो पाठवा. त्यानुसार पैसे जमा होतील.
4 / 5
यानंतर रॉबिनला संशयास्पद वाटल्यानंतर आपली फसवणूक करण्यात येत असल्याचे जाणवले. रॉबिनने कार्डची माहिती देण्यास नकार दिल्यानंतर त्याने फोन बंद केला. त्यानंतर रॉबिनने पुन्हा कॉल केला. मात्र, फोन स्विच ऑफ आला.
5 / 5
या घटनेनंतर युवकाने राणीबाग येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी