पोर्नोग्राफीच नाही तर राज कुंद्रा आधीही सापडलाय वादात, आयपीएलपासून अंडरवर्ल्डपर्यंत झाले आहेत असे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 11:33 IST
1 / 10प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला काल रात्री मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे राज कुंद्राचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज कुंद्रावर मोबाईल अॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट तयार करून विकल्याच आरोप आहे. मात्र वादात सापडण्याची राज कुंद्राची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तो अनेक वादात सापडला आहे, त्याची यादी फार मोठी आहे. त्यातील काही वाद पुढीलप्रमाणे... 2 / 10उद्योगपती राज कुंद्रा शिल्पा शेट्टीसोबत दुसरा विवाह करण्यापूर्वी एवढा चर्चेत नव्हता. मात्र शिल्पासोबतच्या विवाहानंतर तो चर्चेत राहू लागला. त्यासोबतच त्याच्याशी संबंधित वादही समोर येऊ लागले. 3 / 10रंगेल लाईफस्टाईल, शिल्पा शेट्टीसोबतचा विवाह, पहिल्या पत्नीला दिलेला घटस्फोट आणि होम शॉपिंग चॅनेलसोबतच्या वादामुळे राज कुंद्रा चर्चेत आले. 4 / 10राज कुंद्रा याने २००९ मध्ये मॉरिशसमधील एका कंपनीसोबत मिळून आयपीएलमध्ये गुंतवणूक केली होती. तसेच ते राजस्थान रॉयल्स या संघाचे सहमालक बनले होते. दरम्यान, २०१३ मध्ये राज कुंद्राचे नाव सट्टेबाजीच्या प्रकरणात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. 5 / 10आयपीएलमध्ये २०१३ मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राज कुंद्राचे नाव आले होते. त्यानंतर राजस्थान रॉयल्समधील काही खेळाडूंनाही अटक करण्यात आली होती. 6 / 10त्यानंतर राज कुंद्राच्या संघावर २ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. तसेच राज कुंद्राच्या आयपीएलमधील सहभागावर आजन्म बंदी घालण्यात आली. 7 / 10२०१७ मध्ये एका प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पाच इतर लोकांवरही आयपीसीच्या कलम ४२०, ४०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 8 / 10दरम्यान, २०१८ मध्ये राज कुंद्रावर एका अशा कंपनीशी संबंध असल्याचा आरोप झाला होता जी दोन हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा भाग होती. या कंपनीचे नाव गेनबिटक्वाईन असे होते. त्यानंतर ईडीने राज कुंद्राभोवती चौकशीचा पाश आवळला होता. 9 / 10त्याशिवाय अंडरवर्ल्डशीही राज कुंद्राचे नाव जोडले गेले आहे. त्याचे नाव इक्बाल मिर्ची या डॉनशी जोडले गेले होते. या संदर्भात ईडीने त्याची १० तास कसून चौकशी केली होती. 10 / 10तसेच एक बनावट कंपनी बनवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणा ठाणे पोलिसांनीही राज कुंद्रा याची चौकशी केली होती.