शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लिव्ह इन पार्टनरच्या हत्येनंतर पोलिसांकडे गेला, दोन तास थांबला पुन्हा बदलला प्लॅन अन् ...; आरोपीने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 18:19 IST

1 / 9
मुंबईतील श्रद्धा वालकर हत्येसारखीच आणखी एक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील नालासोपारा येथे घडली. तुळींज येथील ४० वर्षीय पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी जीआरपीच्या मदतीने दिल्लीला पळून जाणाऱ्या आरोपीला नागदा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे. आता या संदर्भात आणखी एक माहिती समोर आली. हार्दिक आणि मेघा लिव्ह इन मध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.
2 / 9
हार्दीक शहा असे या आरोपी पतीचे नाव आहे. ही हत्या नेमकी का व कोणत्या कारणामुळे झाली याचा पोलीस आता पुढील तपास करत आहे.
3 / 9
हार्दिक शहा आणि मेघा थोरवी दोघेही नालासोपाऱ्यातील विजयनगरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. हत्या केल्यानंतर हार्दिक शाह तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. पोलीस ठाण्यासमोर दोन तास तो थांबलाही होता. पण, काही वेळानंतर तो परत गेला.
4 / 9
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकने सुमारे दोन तास पोलीस ठाण्याबाहेर घालवले, पण कबुली देण्याचे धाडस झाले नाही. अखेर तो शहरातून फरार झाला. त्यानंतर शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतले. १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत आणण्यात आले. मुंबईत आणल्यानंतर त्याला वसई येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
5 / 9
'गुन्हा घडल्यानंतर सुमारे दोन तास पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये शाह दिसत होता, मात्र तो पोलीस ठाण्यात आला नाही. नंतर राजस्थानला ट्रेन घेऊन पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
6 / 9
शहा याला पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित राहण्याबाबत विचारणा केली असता त्याने पोलिसांनी माहिती दिली. काय करायचे ते ठरवण्याची मानसिक स्थिती नव्हती, असं त्याने पोलिसांना सांगितले.
7 / 9
त्याला गुन्ह्याची कबुली द्यायची होती, पण त्याचवेळी तो त्याची लिव्ह-इन पार्टनर मेघा थोरवीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचाही विचार करत होता, असंही पोलिसांनी सांगितले.
8 / 9
शहा याला जर कबुली द्यायची असेल तर त्याने पोलीस ठाण्यात येऊन कबुली दिली असती. त्याने आत येऊन आपल्या गुन्ह्याची तक्रार करण्याचे धाडस करू शकला नाही.
9 / 9
हार्दिक शाह आणि मेघा हे व्यवसायाने परिचारिका असून ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी नालासोपारा येथील सीता सदनमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस