शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sachin Vaze: पोलीस मुख्यालय, मुलुंड टोलनाका अन् बदललेल्या नंबर प्लेट्स; वाझेंच्या अटकेमागचं कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:16 AM

1 / 10
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचं गूढ उकलण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. पोलीस अधिकारी सचिन वाझेंना या प्रकरणात एनआयएनं अटक केली आहे.
2 / 10
अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेली स्कॉर्पिओ गाडी व्यवसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. हिरेन यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला.
3 / 10
मनसुख हिरेन आणि सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात होते. हिरेन यांच्या मालकीची गाडी वाझे वापरत होते. त्यातच हिरेन यांच्या पत्नीनं वाझेंवर अतिशय गंभीर आरोप केले. त्यामुळे वाझेंच्या अडचणी वाढल्या.
4 / 10
आता वाझेंच्या विरोधात काही भक्कम पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. वाझे वापरत असलेली गाडी २४ फेब्रुवारी आणि १३ मार्चला मुंबईतल्या पोलीस मुख्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. हे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडे आहेत.
5 / 10
वाझे यांच्याकडे असलेली इनोव्हा कार २४ मार्चला ठाण्यात गेली. याच दिवशी कारची नंबर प्लेट बदलली गेल्याचा संशय एनआयएला आहे.
6 / 10
२५ फेब्रुवारीला ठाण्यातून आलेली इनोव्हा कार मुलुंड टोलनाक्यावर दिसली. यावेळी कारचा नंबर MH ०४ AN **** असा होता. त्यानंतर इनोव्हा कार प्रियदर्शनी परिसरात रात्री १.४० ला स्कॉर्पिओ कारजवळ पोहोचली..
7 / 10
रात्री २ वाजून १८ मिनिटांनी दोन्ही कार अंबानींच्या घराजवळ दिसल्या. दोन्ही कारचे चालक तिथून फरार झाले. याच स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या आढळून आल्या.
8 / 10
यानंतर रात्री ३ वाजून ३ मिनिटांनी इनोव्हा कार मुलुंड टोलनाका ओलांडताना दिसली. त्यावेळी गाडीचा नंबर MH04 AN**** होता. नंबर प्लेट बदलून कार पुन्हा अँटिलियाजवळ आली.
9 / 10
यानंतर ओळख लपवण्यासाठी इनोव्हा कारमधून एक व्यक्ती पीपीई किट घालून व्यक्ती बाहेर येते. पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी इनोव्हाचा चालक स्कॉर्पिओ गाडीजवळ येतो.
10 / 10
ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घालून आलेली ही व्यक्ती सचिन वाझेच आहे का, याचाही शोध एनआयएकडून घेतला जात आहे. यासाठी एनआयए वाझे यांना पीपीई किट घालून चालण्यास सांगणार आहे. त्यांची चालण्याची पद्धत आणि सीसीटीव्हीत कैद झालेल्या त्या व्यक्तीची चालण्याची पद्धत पडताळून पाहिली जाईल.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरण