Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं औरंगाबाद कनेक्शन काय? NIA च्या चौकशीत समोर आला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 11:13 IST
1 / 10प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण सध्या राज्यासह देशभरात गाजत आहे, या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केली, त्यानंतर वाझेंच्या चौकशीत विविध खुलासे समोर येत आहेत. 2 / 10या प्रकरणात मनसुख हिरेन यांची हत्या त्याचसोबत अनेक बनावट नंबर प्लेट आढळल्याचा तपास NIA करत आहे, रविवारी या टीमने मुंबईच्या मिठी नदीतून संगणकाची हार्डडिस्क, DVR, CD आणि एका गाडीचे दोन नंबर प्लेट आणि अन्य इलेक्ट्रोनिक साहित्य बाहेर काढलं. या नंबर प्लेटवरून नवीन खुलासा समोर आला आहे. 3 / 10NIA च्या चौकशीत ही नंबर प्लेट राज्य शासनाच्या कल्याण विभागात काम करणाऱ्या क्लर्कच्या गाडीची आहे, जालना येथे राहणारे विजय नाडे यांची चोरी झालेल्या मारूती इको गाडीची ही नंबर प्लेट आहे, ही कार औरंगाबादहून चोरी झाली होती. 4 / 10२० नोव्हेंबर २०२० रोजी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल आहे, NIA सध्या तपास करत आहे की, या कारचं API सचिन वाझे कनेक्शन काय आहे, की तपास भरकटवण्यासाठी या गाडीचा उपयोग केला होता का? या प्रश्नांची उत्तरं NIA अधिकारी शोधत आहेत. 5 / 10याबाबत विजय नाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझी कार १६ नोव्हेंबर २०२० रोजी उद्धवराव पाटील चौकातून चोरी गेलेली आहे. याबाबत सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली. 6 / 10मिठीनदीतून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे फॉरेन्सिक टीम चौकशी करत आहे, NIA च्या टीमने सचिन वाझे यांना सहआरोपी विनायक शिंदे यांच्यासोबत एकत्र बसवून चौकशी करत आहे, यापूर्वी NIA ने क्रिकेट बुकी नरेश गौंड आणि विनायक शिंदे यांची चौकशी केली, सचिन वाझे यांना ३ एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. 7 / 10गेल्या काही दिवसांपासून राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. या संदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येणार असल्याचं सांगितलं जात होतं. 8 / 10निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आपल्याविरुद्धचे पुरावे सापडू नयेत म्हणून गुन्ह्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तू, दस्तऐवज मिठी नदीच्या पात्रात फेकून दिल्या होत्या. रविवारी अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी शोधमोहीम राबविली. वाझेने सांगितलेल्या परिसरात १२ पाणबुड्यांना शोध घेण्यास सांगितले.9 / 10२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिन कांड्या असलेली स्कॉर्पिओ पार्क केलेली सापडली होती. त्यानंतर २ ते ३ दिवसांतच सीआययूच्या अधिकाऱ्यांनी विक्रोळी व ठाणे येथे तपासणी केली. त्या ठिकाणच्या बंटी रेडियम या नंबरप्लेट बनविणाऱ्या दुकानात काझी व अन्य अधिकारी गेले होते10 / 10जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील असं संजय राऊत यांनी सांगितलं.