शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रात्री दुसऱ्यांदा संबंध ठेवण्यास पत्नीने नकार दिला, पतीने उचललं धक्कादायक पाउल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 13:04 IST

1 / 7
उत्तर प्रदेशच्या अमरोहामधून दुसऱ्यांदा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका पतीने पत्नीची निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या लपवण्यासाठी त्याने पत्नीचा मृतदेह एका पोत्यात टाकून जंगलात नेऊन फेकला. इतकंच नाही तर आरोपीने अमरोहाच्या पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दुसरीकडे बेवारस मृतदेह सापडल्याने मुरादाबाद पोलीस आरोपीपर्यंत जाऊन पोहोचले. सध्या पोलीस आरोपीच चौकशी करत आहेत.
2 / 7
अमरोहाच्या कोतवाली भागातील बेकरी चालवणारा सलीम (बदललेलं नाव) ने 5 डिसेंबरच्या सकाळी 4 वाजता पत्नी रूक्साना (बदललेलं नाव) सोबत संबंध ठेवले. थोड्या वेळाने जेव्हा त्याने पुन्हा संबंध ठेवण्याचा विचार केला तर पत्नीने नकार दिला.
3 / 7
दोघांमध्ये यावरून भांडण झालं तर संतापलेल्या सलीमने पत्नीचा दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. नंतर मृतदेह प्लास्टिकमध्ये भरून बाईकवरून रतूपुरामध्ये जंगलात नेऊन फेकला. परत येऊन त्याने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली.
4 / 7
दुसरीकडे काही लोकांना एका पोत्यात बेवारस मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेच याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी तिचे फोटो पाठवले. आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही या महिलेबाबत माहिती घेतली जात होती.
5 / 7
अशात अमरोहा कोतवालीमध्ये रूक्साना नावाची एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार समोर आली. फोटो चेक केला तर मृतदेह अमरोहाच्या रूक्सानाचा निघाला. त्यानंतर मुरादाबाद पोलिसांनी मृत महिलेच्या पतीची चौकशी केली तर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याने त्याचा भाऊ फैसलची मदत घेतली होती. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
6 / 7
सीओ सिटी विजय कुमार राणा यांनी सांगितलं की, नजमा खातून यांनी तक्रार दाखल केली होती की, मुलगी रूक्साना काही न सांगता कुठेतरी गेली आहे. अशात अशी माहिती मिळाली की, 5 डिसेंबरला जंगलात एक मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह रूक्सानाचा निघाला. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता बघता लगेच सुगावा लावला.
7 / 7
सीओ सिटी विजय कुमार राणा यांनी सांगितलं की, नजमा खातून यांनी तक्रार दाखल केली होती की, मुलगी रूक्साना काही न सांगता कुठेतरी गेली आहे. अशात अशी माहिती मिळाली की, 5 डिसेंबरला जंगलात एक मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह रूक्सानाचा निघाला. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता बघता लगेच सुगावा लावला.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी