शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अविश्वसनिय! सून आणि सासऱ्याच्या लव्हस्टोरीनं घेतला मुलाचा जीव, वाचून पायाखालची जमीनच सरकेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 13:35 IST

1 / 10
पश्चिम राजस्थानमधून (Rajasthan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या जैसलमेर जिल्ह्यात पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
2 / 10
इथे एका सासऱ्याने आपल्याच सुनेसोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधामुळे (Illegal love affair) मुलाला शॉक देऊन त्याची हत्या केली. म्हणजे वडिलाचं मुलाच्या पत्नीसोबत अफेअर सुरू होतं. ज्यात अडसर ठरत असलेल्या मुलाची वडिलांनीच हत्या केली. यात त्याला सूनेची मदत मिळाली.
3 / 10
झालं असं की, वडिलांनी मुलाला शॉक देण्याआधी मृत व्यक्तीच्या पत्नी त्याला लिंबाच्या सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे पती बेशुद्ध झाला.
4 / 10
दहा दिवसांआधी झालेल्या या हत्याकांडाचा बुधवारी पर्दाफाश झाला तेव्हा ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी आरोपी वडील आणि त्याच्या सूनेला अटक केली आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहे.
5 / 10
नाचना पोलीस अधिकारी हुकमाराम बिश्नोई यांनी सांगितलं की, ही घटना आसकन्द्रा गावातील आहे. १० दिवसांपूर्वी इथे एक तरूण हिरालाल मेघवाल यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
6 / 10
कुटुंबियांनी तरूणावर अंत्यसंस्कार केले होते. मात्र मृतक हिरालालचा लहान भावाने हत्येची शंका व्यक्त करत तक्रार दाखल केली.
7 / 10
त्यानंतर पोलिसांनी मृतकाचा दफन केलेला मृतदेह कबरेतून बाहेर काढून मेडिकल बोर्डने त्याचं पोस्टमार्टम केलं. या भागात मेघवाल समाजातील लोकांचे मृतदेह दफन करण्याची परंपरा आहे.
8 / 10
त्यानंतर पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली तेव्हा हैराण करणारे खुलासे झालेत. पोलिसांनी जेव्हा हिरालालची पत्नी पारलेची चौकशी केली तर पूर्ण घटनेचा उलगडा झाला. चौकशी दरम्यान पारलेने स्वीकारलं की, तिने तिचे सासरे मुकेश कुमारसोबत मिळून हिरालालची हत्या केली.
9 / 10
हिरालालच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या रात्री त्याने लिंबू सरबतात झोपेच्या गोळ्या मिक्स करून हिरालाल दिलं होतं. याने तो काही वेळातच बेशुद्ध झाला. नंतर दोघांनी मिळून म्हणजे सून आणि सासऱ्याने मुलाला शॉक देऊन त्याची हत्या केली.
10 / 10
पोलिसांनी सांगितले की, पारले आणि तिच्या सासऱ्याचे अनैतिक संबंध आहेत. यामुळेच त्यांनी हिरालालला रस्त्यातून हटवण्यासाठी प्लॅन करून त्याची हत्या केली. पण हिरालालच्या लहान भावाच्या एका शंकेमुळे दोघांचंही सत्या बाहेर आलं.
टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी