शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्न नाही केलं म्हणून मुलाला कापून फेकलं, आधी मुलगी ड्रग्स घेत होती तिचीही केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 15:08 IST

1 / 8
नुकतीच एक बातमी समोर आली होती की, ईराणमध्ये एका दाम्पत्याने त्यांच्या ४७ वर्षीय फिल्ममेकर मुलाची हत्या केली होती. कारण काय तर तो लग्न करत नव्हता. आता या केसमध्ये समोर आलं की या ईराणी दाम्पत्याने केवळ आपल्या मुलाचीच नाही तर मुलीची आणि जावयाची देखील हत्या केली आहे.
2 / 8
८१ वर्षीय अकबर खोर्रामदीन आणि ७४ वर्षीय त्याची पत्नी इरन हिला तीन आठवड्यांपूर्वी तेहरानमध्ये अटक करण्यात आली होती. या दाम्पत्यावर आरोप होता की, त्यांनी त्यांच्या मुलाच्य शरीराचे आधी तुकडे आणि नंतर घराजवळच्या कचरा पेटीत फेकले होते.
3 / 8
ईराण मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांकडून चौकशी केली जात असताना दाम्पत्याने आपल्या मुलाची हत्या केल्याची बाब मन्य केली. तसेच चौकशी दरम्यान असंही समोर आलं की, या कपलने गैरवर्तणुकीसाठी जावई आणि मुलीची हत्या केल्याचंही मान्य केलं.
4 / 8
याप्रकरणी अकबरची पत्नी म्हणाली की, आम्ही दोघांनीच ही हत्या प्लॅन केली होती. माझ्या पतीने मला विचारलं आणि मी त्यांना सहमती दर्शवली. मला या हत्येबाबत अजिबात दु:खं नाहीये. त्या लोकांमुळे आम्हाला खूप काही सहन करावं लागलंय.
5 / 8
या दाम्पत्याने सांगितलं की, त्यांनी त्यांच्या मुलाच्या जेवणाचं गुंगीचं औषध टाकलं होतं. त्यानंतर त्याची हत्या केल्यावर त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि ते कचऱ्यात नेऊन फेकले. या दाम्पत्याने सांगितलं की, याप्रकारे त्यांनी त्यांच्या जावयाची आणि मुलीची हत्या केली होती.
6 / 8
पोलिसांनुसार, या कपलने आपल्या मुलीची हत्या केली होती, कारण ती ड्रग्स घेत होती आणि आपल्या बॉयफ्रेन्डला घरी घेऊन येत होती. तेच जावयाला मारण्याचं कारण हे होतं की, तो या दोघांनाही त्रास देत होता. या दाम्पत्याला आणखी दोन मुले आहे आणि ते ठीक आहेत.
7 / 8
४७ वर्षीय मृत मुलगा बबाक खोरम्मदीन लंडनमध्ये राहून सिनेमे बनवत होता. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, तो ईराणमध्ये लहान मुलांना सिनेमा शिकवण्यासाठी आला होता. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याचं आणि त्याच्या आई-वडिलांचा त्याच्या लग्न न करण्यावरून जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर त्याची हत्या केली गेली.
8 / 8
दरम्यान, याप्रकरणी ईराण इंटरनॅशनल टीव्हीचे एडीटर जेसन ब्रॉडस्की म्हणाले होते की, ईराणमध्ये कौटुंबीक हिंसा कोरोना काळामुळे जास्त घातक झाली आहे. दिग्दर्शकाची हत्या याचा पुरावा आहे. गेल्यावर्षीही १४ वर्षीय मुलगी रोमिनाची ऑनर किलिंग करण्यात आली होती.
टॅग्स :IranइराणCrime Newsगुन्हेगारी