शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पतीनं मित्रांच्या साथीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार; दरवाजाला बांधले होते तिचे पाय!

By मोरेश्वर येरम | Updated: January 16, 2021 13:43 IST

1 / 9
पती-पत्नीच्या अतूट नात्याला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात घडली आहे. पतीने आपल्या मित्रांच्या साथीने स्वत:च्याच पत्नीवर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
2 / 9
जालौरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या आईने येऊन तिच्या जावई आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार नोंदवली आहे.
3 / 9
पीडित महिलेचा पती सिरोही येथील मणादार नावाच्या गावात कामाला होता. पीडितेला तीन मुलं देखील आहेत.
4 / 9
१२ जानेवारी रोजी पीडितेचा पती घरी आला तिला मोटारसायकलवरुन मणादार गावी घेऊन गेला.
5 / 9
मणादार गावात पीडितेला धक्काबुक्की केली गेली आणि तिला एका घरात कोंडून लोखंडी दरवाजाला तिचे पाय बांधण्यात आले.
6 / 9
खोलीत पीडितेचा पती आणि त्याचे मित्र अर्जुन सिंह, छगना राम आणि नारायण हे दारुच्या नशेत धुंद झाले होते. त्यानंतर या सर्वांनी मिळून आपल्यावर अत्याचार केले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
7 / 9
दुसऱ्या दिवशी पीडितेचे आई-वडिल घटनास्थळी पोहोचल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आली. पीडितेच्या आईने तातडीने पोलीस ठाणे गाठून पोलीस अधिक्षक श्याम सिंह यांच्याकडे याची तक्रार नोंदवली.
8 / 9
आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पीडितेच्या आरोग्याची मेडिकल टीमकडून तपासणी केली जात असल्याची माहिती जालौरचे सहपोलीस आयुक्त कैलाश कुमार यांनी सांगितलं.
9 / 9
कलम १६१ अंतर्गत पीडित महिलेचा जबाब नोंदविण्यात आला असून आरोपींवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फरार गुन्हेगारांना शोधण्यासाठी विशेष पथक देखील नियुक्त करण्यात आलं आहे.
टॅग्स :Rapeबलात्कारRajasthanराजस्थानGang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिस