शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ

गुडघ्याला बाशिंग...! एकाच नवरीची चार नवरदेव वाट पाहत होते, सर्व एकत्र पोहोचताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 12:34 IST

1 / 10
भोपाळच्या कोलारमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक नवरदेव लग्नासाठी आला परंतू त्याला नववधूच सापडली नाही. यामुळे तो पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला. तिथे जाताच त्याला त्याच्यासारखेच आणखी तीन नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले दिसले.
2 / 10
पोलिसांनी या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. हरदाला राहणारा एक तरुण गुरुवारी लग्नासाठी भोपाळच्या कोलारमध्ये गेला होता. जन कल्याण समितीच्या कार्यालयात त्याचे लग्न होणार होते. तिथे टाळे लागलेले होते.
3 / 10
दरवाजाला टाळे पाहून नवरदेवाने आणि त्याच्या कुटुंबाने मुलीची चौकशी केली. तेव्हा त्यांना या नावाचे कोणी राहत नसल्याचे सांगितले गेले आणि पायाखालची वाळूच सरकली.
4 / 10
यानंतर त्यांनी मुलीच्या नातेवाईकाच्या मोबाईल नंबरवर फोन केला तर तो फोन बंद आला. यामुळे काहीतरी गडबड असल्याचा संशय नातेवाईकांना आला.
5 / 10
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोलारच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे आधीपासूनच आणखी तीन नवरदेव लग्नाच्या पूर्ण तयारीत आल्याचे दिसले. या साऱ्यांचे चेहरे उतरलेले होते.
6 / 10
याच नवरीसोबत आणखी तीन नवरदेव लग्न करण्यासाठी आले होते. यानंतर चारही नवरदेवांना लग्नाच्या नावाखाली फसविल्याचे समोर आले.
7 / 10
सीएसपी भूपेंद्र सिंह यांनी या प्रकरणी सांगितले की, नवरदेवांच्या आरोपांवरून चौकशी सुरु केली असता या टोळीमध्ये तीन जण असल्याचे समोर आले आहे. फोन नंबरच्या आधारे त्यांचा पत्ता शोधला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष आहेत.
8 / 10
हे लोक ज्या जिल्ह्यांमध्ये लग्नासाठी मुलींची संख्या कमी आहे, किंवा लग्न करण्यात अडचणी आहेत अशा ठिकाणी जाऊन प्रचार करायचे. या प्रचारावेळी ते लोकांना आपला मोबाईल नंबर द्यायचे. नवरी मिळत नसल्याने किंवा लग्न जुळत नसल्याने लोक त्यांना फोन करायचे. त्यांना भोपाळला बोलविले जायचे.
9 / 10
भोपाळमध्ये काही तरुणींना हे टोळके 200 ते 500 रुपयांमध्ये घेऊन यायचे. लेबर चौकात कामाच्या शोधात या तरुणी असायच्या. मुलाकडच्यांना त्या मुली दाखविल्या जायच्या. जेव्हा त्यांना मुलगी पसंत पडायची तेव्हा ते मुलाकडच्यांकडून 20000 रुपये घ्यायचे आणि लग्न ठरल्याचे सांगायचे.
10 / 10
सध्या या तिकडीला पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच या लोकांचे जुने गुन्हेदेखील तपासले जात आहेत.
टॅग्स :marriageलग्नfraudधोकेबाजी