शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Shocking! बाथटबमध्ये बुडवून गर्लफ्रेन्डची केली हत्या, कारण वाचून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 15:34 IST

1 / 10
कोणत्याही नात्यात वाद-भांडण होत असतात. त्यामुळे असंही म्हटलं जातं की, ती नाती फार सुंदर असतात ज्यात प्रेमळ भांडण होतात. पण कधी कधी काही गोष्टी फारच वादाचं कारण ठरतात. ज्याचा परिणाम फार खतरनाक होतो. दुबईतून एक अशी घटना समोर आली, जी वाचून तुमचा थरकाप उडेल.
2 / 10
इथे एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेन्डला बाथटबमध्ये बुडवून तिची निर्दयीपणे हत्या केली. पण सर्वात जास्त हैराण करणारी बाब म्हणजे जेव्हा लोकांसमोर त्याचं सत्य समोर आलं तेव्हा त्याने असं अजब कारण सांगितलं जे ऐकून सगळेच चक्रावले.
3 / 10
एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने आधी मित्रांकडे दावा केला होता की, त्याच्या गर्लफ्रेन्डची तब्येत केल्या काही दिवसांपासून ठीक राहत नाही आणि तो तिला बरं करण्याचा प्रयत्न करत आहे.
4 / 10
यानंतर एक दिवस अचानक त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डची बाथटबमध्ये बुडवून हत्या केली. पण त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं की, त्याच्या गर्लफ्रेन्डने आत्महत्या केली.
5 / 10
रिपोर्टनुसार, गर्लफ्रेन्डला मारण्याच्या काही वेळाआधी आपल्या एका मित्राला तो म्हणाला होतो की, माझ्या गर्लफ्रेन्डच्या अंगात जिन आहे. त्यामुळे तिची समस्या दूर करण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे.
6 / 10
गर्लफ्रेन्ड मारल्यानंतरही तो हेच म्हणाला की, त्याच्या गर्लफ्रेन्डच्या अंगात भूत होतं. पण जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली गेली तेव्हा समोर आलं की, तो बऱ्याच वर्षांपासून त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत रिलेशनशिपमध्ये होता.
7 / 10
आरोपीचे अनेक अफेअर्स होते ज्यामुळे तो या रिलेशनशिपमध्ये काहीच इंटरेस्ट घेत नव्हता. आधी त्याने गर्लफ्रेन्डला मारहाण केली. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.
8 / 10
त्यानंतर त्याने गर्लफ्रेन्डला बाथटबमध्ये बुडवलं आणि अनेक तास तिची बॉडी पाण्यातच पडून होती. रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा झाला की, ज्या दिवशी त्याने गर्लफ्रेन्डला मारलं त्या दिवशी तो नशेत होता.
9 / 10
यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेन्डला बाहेर काढलं आणि नंतर अॅम्बुलन्स बोलवली. याप्रकरणी आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या गर्लफ्रेन्डने आत्महत्या केली. ज्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांना आढळून आलं की, त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डची हत्या केली.
10 / 10
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मित्रांचे आणि शेजाऱ्यांचे जबाब घेतले. आरोपीला या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
टॅग्स :DubaiदुबईCrime Newsगुन्हेगारी