शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बनावट क्रिप्टो करन्सी; केरळमध्ये १२०० कोटींची फसवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 7:55 AM

1 / 7
क्रिप्टोकरन्सीने सध्या अनेकांना भुरळ घातली आहे. विशेषत: मिलेनियल्समध्ये या कूटचलनाचे विशेष आकर्षण आहे. मात्र, यातील गुंतवणूक धोक्याची असल्याचे अनेक तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत.
2 / 7
भारतात या चलनावर बंदीच आणावी, अशी मागणी होत आहे. तरीही अनेकजण यात पैसे गुंतवत आहेत. केरळमध्ये तर १२०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
3 / 7
केरळमध्ये काही जणांनी ‘मॉरिस कॉइन’ नावाचे क्रिप्टोकरन्सी जारी केले. शेअर बाजारात लिस्टिंग होण्यासाठी कंपन्या जशा आयपीओ जारी करतात तशीच ऑफर ‘मॉरिस कॉइन’साठी देण्यात आली होती. कोईमतूरस्थित फ्रँक एक्स्चेंज येथे या कॉइनचे लिस्टिंग करण्यात आले.
4 / 7
१५०० रुपयांना एक मॉरिस कॉइन अशी दहा कॉइन्सची प्रारंभिक विक्री ऑफर होती. लिस्टिंगनंतर कॉइनची किंमत वेगाने वाढेल, असेही प्रलोभन दाखवण्यात आले. ९०० लोकांनी या क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवले. ३०० दिवसांपर्यंत गुंतवलेली रक्कम काढता येणार नाही, अशीही अट घातली गेली.
5 / 7
मॉरिस कॉइन लाँच करणाऱ्या लोकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. ज्या लोकांनी या या चलनात पैसे गुंतवले ते सर्व पैसे टप्प्याटप्प्याने काढून घेण्यात आले. १२०० कोटी रुपयांची रक्कम चोरांनी विविध मालमत्तांच्या खरेदीत गुंतवली.
6 / 7
ईडीने आतापर्यंत या प्रकरणी केरळ, तामिळनाडू कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांत धाडी टाकल्या. त्यात तीन कंपन्यांचा समावेश असून उन्नी मुकुंदन या मल्याळम अभिनेत्याच्या चित्रपटनिर्मिती कंपनीचाही त्यात समावेश आहे.
7 / 7
निषाद या मास्टरमाइंडलाही ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणातील सर्वांची सध्या चौकशी सुरू असून लोकांनी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन तपास यंत्रणांतर्फे करण्यात आले आहे.
टॅग्स :Cryptocurrencyक्रिप्टोकरन्सीCrime Newsगुन्हेगारी