शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:26 IST

1 / 7
मागील काही दिवसांपासून अनैतिक संबंधातून हत्या आणि आत्महत्या केल्याच्या देशभरातून अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता अशीच आणखी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी उत्तर प्रदेशमधील आहे.
2 / 7
ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील आहे. येथे एक पत्नी तिच्या पतीसमोर तिच्या प्रियकरासोबत लैंगिक संबंध ठेवत होती. पत्नीच्या या लज्जास्पद कृत्याला कंटाळून पतीने आत्महत्या केली. या प्रकरणात, मृताच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. या आधारे, मृताची पत्नी, मेहुणे आणि पत्नीच्या प्रियकरावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
3 / 7
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलंदशहरमधील काकोड पोलीस ठाणे परिसरातील वैरा बादशाहपूर गावातील रहिवासी असिफची पत्नी रुबिना हिचे गावातील सलीम नावाच्या तरुणाशी अवैध संबंध होते.
4 / 7
सलीम रुबिनाला नशेच्या गोळ्या देत होता, त्या गोळ्या ती तिचा पती आसिफला खायला देत होती. त्यानंतर रुबिना आणि सलीम पतीसमोरच अवैध संबंध ठेवत होते.
5 / 7
याबाबत आसिफने त्याच्या भावाला माहिती दिली होती. ९ जुलै रोजी आसिफने भावाला सांगितले होते की, त्याची पत्नी त्याला नशेच्या गोळ्या दिल्यानंतर त्याच्यासमोर तिच्या प्रियकरासोबत लैंगिक संबंध ठेवते. हा प्रकार समोर आल्यानंतर ती मला म्हणते की हे सर्व पाहून किमान तू मरशील आणि आमचा मार्ग मोकळा होईल.
6 / 7
यानंतर, ११ जुलै रोजी आसिफने रात्री घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या भावाने काकोड पोलिस ठाण्यात रुबीना, सलीम आणि शाहरुखविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
7 / 7
मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्याच्यासमोर लैंगिक संबंध ठेवायचे तेव्हा आसिफला त्या परिस्थितीत वाईट वाटायचे. यामुळे तो नाराज झाला होता, त्याला अस्वस्थ वाटत होते. दिवसेंदिवस त्याच्या पत्नीचे वागणे बदलत होते. त्यामुळे अखेर आसिफने टोकाचे पाऊल उचलले.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस