शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

शेजारील व्यक्तीच्या बकरीजवळ गेला बकरा; मालकानं बेदम मारुन जीवच घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 16:23 IST

1 / 10
बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून एक फारच धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका बकऱ्याच्या मृत्यूची पोलीस चौकशी करत आहेत. बकऱ्याच्या मालकाचा आरोप आहे की, शेजाऱ्याच्या बकरीकडे त्याचा बकरा गेला होता. याचाच राग धरून शेजाऱ्याने बकऱ्याला काठीने मारून मारून त्याची हत्या केली. पोलिसांनी बकऱ्याच्या बॉडीचं पोस्टमार्टम केलं.
2 / 10
चौरसिया गावात १५ जुलैला एका बकऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बकऱ्याची मालकीन राधा देवीचा आरोप आहे की, शेजाऱ्याने तिच्या बकऱ्याला काठीने मारून मारून हत्या केली.
3 / 10
तिने पोलिसात तक्रार देत सांगितलं की, बकऱ्याचा गुन्हा केवळ इतका होता की, तो शेजाऱ्याच्या घरात बांधलेल्या बकरीला बघून तिच्याकडे गेला.
4 / 10
शेजारी सीपू रामला हे दिसलं तेव्हा त्याने बोकडावर हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. राधा देवीने शेजारी सीपूसोबतच त्याची आई आणि वडिलांविरोधातही तक्रार दिली. तेही बोकडाच्या हत्येत सहभागी असल्याचा तिने आरोप केला.
5 / 10
पोलीस स्टेशनमध्ये आलेली महिला रडत रडत न्यायाची मागणी करत होती. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बोकडाचं पोस्टमार्टम केलं. पीडितेने सांगितलं की, तिच्या बोकडाची किंमत जवळपास १५ हजार रूपये होती.
6 / 10
पशु चिकित्सकांनी सांगितलं की, एका बोकडाची बॉडी पोलिसांनी आणली होती. ज्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. रिपोर्ट यायला जरा वेळ लागेल, नंतर कळेल बोकडाचा मृत्यू कशामुळे झाला.
7 / 10
तेच घटनास्थळी पोहोचलेल्या एएसआयने सांगितलं की, बोकडाच्या मृत्यूचं प्रकरण पोलिसात आलं होतं. त्याची बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आली होती. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
8 / 10
कैमूर जिल्ह्यातील ही अशी काही पहिली घटना नाही. याआधीही काही प्राण्यांचे पोस्टमार्टम झाले आहेत. २ वर्षाआधी एका कोंबड्याला मारण्यासाठी ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही कोंबड्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं होतं.
9 / 10

10 / 10

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके