बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 20:42 IST
1 / 9कोलकाता पोलिसांच्या एका तुकडीने पश्चिम बंगालमधून एका बांगलादेशी मॉडेलला अटक केली. ती आधी एअरहॉस्टेस होती. त्यानंतर ती मॉडेल आणि अभिनेत्री बनली.2 / 9गेल्या ६ वर्षांपासून ती कोलकातामध्ये राहत होती. पार्क स्ट्रीट पोलिस स्टेशनने मॉडेलवर बीएनसीच्या कलम ३३६(३)/ ३३८/ ३४१/ ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.3 / 9आरोपी महिलेचे नाव शांता पॉल असून ती २८ वर्षांची आहे. ती भाड्याच्या खोलीत राहत होती. पोलिसांनी तिच्या राहत्या घरी छापा टाकून संध्याकाळी ४ वाजता अटक केली.4 / 9पोलिसांच्या झडतीदरम्यान, तिचे अनेक बांगलादेशी पासपोर्ट, रीजेंट एअरवेज (बांगलादेश) कर्मचारी कार्ड, ढाका माध्यमिक शिक्षण प्रवेशपत्र या सगळ्या गोष्टी सापडल्या.5 / 9धक्कादायक बाब म्हणजे, त्या कागदपत्रांसोबतच तिचे भारतीय आधार कार्ड, भारतीय मतदार कार्ड, विविध पत्त्यांचे रेशन कार्डही सापडले. पोलिसांनी हे सर्व जप्त केले.6 / 9पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताला अॅप कॅबचा व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पकडले. ती २०२३ पासून त्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती.7 / 9शांता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पत्त्यांसह राहायची. अलिकडेच तिच्याविरूद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात झाली होती. त्या प्रकरणातही ती वेगळ्याच पत्त्यावर राहत होती.8 / 9अधिक माहितीनुसार, ती बांगलादेशातील दोन प्रसिद्ध कंपन्यांसाठी मॉडेल म्हणून काम करत असल्याचे उघड झाले. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला होता.9 / 9शांताच्या घरातून एअरलाइन आयडी कार्डदेखील सापडले. ती आधी एअरहॉस्टेस होती. शांताच्या घरात सापडलेली कागदपत्रे तिने कशाच्या आधारे मिळवली, याचा पोलिस तपास करत आहेत.