शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भन्नाट...एकदा चार्ज केल्यावर तब्बल 800 किमी धावणार हा पिकअप ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 14:48 IST

1 / 10
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सारेच त्रस्त झाले आहेत. प्रदुषणानेही डोके वर काढले आहे. यामुळे जगभरातील देशांनी इलेक्ट्रीक वाहनांसाठी पुढाकार घेतला आहे. टेस्लाच्या कार अमेरिकेमध्ये धूम माजवत आहेत.
2 / 10
या कंपनीने नवा Cybertruck लाँच केला असून एका चार्जिंगमध्ये तब्बल 800 किमीचे अंतर पार करणारा Cybertruck लाँच केला आहे.
3 / 10
टेस्लाने नुकतीच ही कार दाखविली आहे. एलॉन मस्क यांनी कारच्या काचेची टेस्ट दाखविण्यासाठी लोखंडी बॉल फेकला. मात्र, पुढची विंडो काच फुटली. यानंतर मस्क यांनी पॅसेंजर काचेवर फेकायला सांगितला. ही काचही फुटल्याने हशा पिकला.
4 / 10
हा प्रकार अशावेळी घडला जेव्हा या सायबर ट्रकसाठी लाखो लोकांनी मागणी नोंदविली आहे. लाँच होऊन ट्रकला 4 दिवस झाले आहेत.
5 / 10
हा इलेक्ट्रीक पिकअप ट्रक 3 वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये रेंज आणि ताकदीचे अंतर असणार आहे.
6 / 10
याची रेंज 402.33 किमी असणार आहे. तर वेग 6.5 सेकंदामध्ये 0 ते 96.5 किमी प्रती तास वेग पकडणार आहे.
7 / 10
याची रेंज ड्युअल मोटर ऑन व्हील ड्राईव्हमुळे 482.80 किमी आहे. म्हणजेच ही एकदा चार्ज केली की 482.80 किमी धावू शकणार आहे. 4.5 सेंकदात 0 ते 96.5 किमी प्रती तास वेग पकडणार आहे.
8 / 10
याची रेंज Tesla Cybertuck ट्राय मोटर 804.67 किमीची आहे. ही कार एकावेळी चार्ज केल्यावर 804.67 किमी चालणार आहे. 2.9 सेकंदात 0 ते 96.5 किमी प्रती तास वेग पकडणार आहे.
9 / 10
किमतीच्या बाबतीत टेस्लाने विचार केलेला आहे. पहिल्या मॉडेलची किंमत 28,57,947 रुपये, दुसऱ्या मॉडेलची किंमत 35,74,224 रुपये ठेवण्यात आली आहे.
10 / 10
तर 800 किमीची रेंज असलेल्या ट्रकची किंमत 50,06,779 रुपये ठेवण्यात आली आहे.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर