FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
By जयदीप दाभोळकर | Updated: August 11, 2025 09:03 IST
1 / 9प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांनी आयुष्यात पुढे जावं, परंतु अनेक वेळा असं घडतं की आर्थिक अडचणी या मार्गात सर्वात मोठा अडथळा बनतात. मग अशा परिस्थितीत, भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) 'जीवन तरुण पॉलिसी' एक उत्कृष्ट आधार ठरू शकते. हो, ही पॉलिसी केवळ मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत करत नाही तर त्यांचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित देखील करतं. ज्यामुळे वेळेवर मिळालेल्या निधीनं मुलांची स्वप्नं पूर्ण करणं सोपं होतं.2 / 9एलआयसीची 'जीवन तरुण पॉलिसी' विशेषतः मुलांच्या शिक्षणाच्या आणि तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ही योजना पालकांना छोट्या गुंतवणुकीद्वारे मोठा निधी निर्माण करण्याची संधी देते. विशेष म्हणजे दररोज फक्त १५० रुपये जमा करुन तुम्ही महिन्याला ४५०० रुपये गुंतवू शकता. ४५०० रुपयांच्या या गुंतवणुकीतून तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुमारे २६ लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.3 / 9हा मोठा निधी मुलाचे उच्च शिक्षण, करिअर सुरू करणे किंवा इतर महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, ज्यामुळे मुलांचं भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होतं. म्हणूनच पालकांसाठी एलआयसी जीवन तरुण पॉलिसी हा एक उत्तम पर्याय आहे.4 / 9जरी ही मर्यादित प्रीमियम पेमेंट योजना असली, तरी यामध्ये गुंतवणुकीचा तसंच विमा संरक्षणाचा लाभ मिळू शकतो. असं मानलं जातं की या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारक निश्चित कालावधीसाठी प्रीमियम भरतो आणि मूल २५ वर्षांचं झाल्यावर एकरकमी रक्कम मिळते.5 / 9जर तुम्ही एलआयसी जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर ती दरमहा सुमारे ४,५०० रुपये आणि वार्षिक ५४,००० रुपये इतकी होते. तसेच, जर ही पॉलिसी मुलासाठी १ वर्षाच्या वयात सुरू केली आणि २५ वर्षे चालू ठेवली तर पॉलिसीच्या शेवटी, सुमारे २६ लाख रुपयांची मॅच्युरिटी रक्कम मिळू शकते. या निधीमध्ये विमा रक्कम, वार्षिक बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस समाविष्ट असू शकतो. ही योजना मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर मोठ्या खर्चासाठी एक मजबूत आर्थिक आधार बनू शकते.6 / 9 एलआयसी जीवन तरुण पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी, मुलांचं किमान वय ९० दिवस आणि जास्तीत जास्त १२ वर्षे असणं आवश्यक आहे. हो, जर मूल १२ वर्षांपेक्षा मोठं असेल, तर ही योजना उपलब्ध होणार नाही. पॉलिसीचा एकूण कालावधी मुलाच्या सध्याच्या वयाच्या आधारावर ठरवला जातो. उदाहरणार्थ, जर मूल ५ वर्षांचं असेल, तर पॉलिसीचा कालावधी २० वर्षे (२५ वर्षे पूर्ण होईपर्यंत) असेल.7 / 9याची खासियत अशी आहे की तुम्हाला केवळ मॅच्युरिटीवरच नाही तर त्यादरम्यानही पैसे मिळू शकतात. मूल २० वर्षांचं झाल्यावर, २४ वर्षांचं होईपर्यंत दरवर्षी मनी बॅकच्या रुपात एक निश्चित रक्कम परत दिली जाऊ शकते. त्यानंतर, २५ व्या वर्षी पॉलिसीची संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम एकत्रितपणे मिळू शकते, ज्यामध्ये उर्वरित विमा रक्कम, वार्षिक बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस समाविष्ट आहे, अशा प्रकारे ही योजना प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते.8 / 9 एलआयसी जीवन तरुण पॉलिसी कर वाचवण्याची संधी देखील देते. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळवू शकता. तसंच, पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम किंवा अपघात झाल्यास मिळणारं डेथ बेनिफिट पूर्णपणे करमुक्त आहे, कारण तो कलम 10(10D) अंतर्गत येतो. 9 / 9(टीप: हा लेख केवळ माहितीसाठी देण्यात आलेला आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)