1 / 18कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे देशभरातील बर्याच लोकांना सध्या पैशांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. 2 / 18जर तुम्हााही पैशांची समस्या जाणवत असेल आणि तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही आता पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) खात्यातून फक्त १% व्याजावर कर्ज घेऊ शकता. 3 / 18तसंच पैशांच्या मदतीनं तुम्ही तुमची कामंही करू शकता. पीपीएफ खात्यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यात जमा केलेल्या रकमेच्या आधारे कर्ज घेऊ शकता. 4 / 18या कर्जावर जे व्याज द्यावे लागेल ते वैयक्तिक कर्ज, सोन्याचे कर्ज आणि इतर प्रकारच्या कर्जापेक्षा खूपच कमी आहे.5 / 18आर्थिक नियोजक जितेंद्र सोलंकी म्हणाले की पीपीएफ खात्यातून कर्ज घेण्यासाठी अटी व शर्ती पाळाव्या लागतात. 6 / 18पहिला नियम असा आहे की पीपीएफ खाते कमीतकमी तीन वर्ष जुनं असावं. दुसरा नियम असा आहे की कर्ज फक्त तीन वर्ष ते सहा वर्षांच्या दरम्यानच मिळेल. 7 / 18तिसरा नियम असा आहे की तुम्हाला खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेपैकी केवळ २५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळेल. 8 / 18तिसर्या वर्षी कर्ज घेतल्यास दोन वर्षानंतर जमा झालेल्या रकमेच्या आधारे त्याची गणना केली जाईल. 9 / 18आपण एप्रिलपासून कोणत्याही महिन्यासाठी कर्जासाठी अर्ज केल्यास ३१ मार्चपर्यंत जमा केलेल्या रकमेवर गणना केली जाईल.10 / 18कर आणि गुंतवणूक सल्लागार मणिकरण सिंघल म्हणाले की पीपीएफ खात्यावर कर्ज तीन वर्षांसाठी म्हणजेच ३६ महिन्यांसाठी उपलब्ध आहे. या कालावधीत घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी लागेल. 11 / 18पीपीएफ व्याज मोजताना कर्जाच्या रक्कमेची कपात केली जाते. जर आपण ३६ महिन्यांत कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसाल तर आपल्याला ६ टक्के दराने व्याज द्यावे लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.12 / 18कर्ज घेतलाना तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधता येऊ शकतो.13 / 18कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची किंवा काहीही तारण ठेवण्याची आवश्यतकता नसते.14 / 18कर्ज घेतला पीपीएफ व्याजावर टॅक्सची सूट मिळत नाही. ती बंद होते. 15 / 18व्याजासह कर्जाची रक्कम परत करणं आवश्यक असतं. अन्यथा तुम्हाला कोणताही टॅक्सचा लाभ मिळत नाही. 16 / 18पीपीएफ खातं उघडल्यानंतर तिसऱ्या आणि सहाव्या वर्षाच्या दरम्यानच तुम्ही कर्ज घेऊ शकता.17 / 18वर्षात केवळ एकदाच कर्ज घेण्याची मुभा असते. तसंच पहिल्यांदा घेतलेलं कर्ज परत केल्यानंतरच तुम्हाला पुढील कर्ज दिलं जातं.18 / 18पीपीएफद्वारे कर्ज घेताना तुमच्या क्रेडिट स्कोअरची गरज भासत नाही.