शेअर मार्केटमध्ये गुतंवणूक नाही म्हणून बिनधास्त आहात, मग समजून घ्या तुम्हाला कसा बसतोय फटका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:33 IST
1 / 7ट्रम्प टॅरिफमुळे जगभरातील बाजारात प्रचंड चढ-उतार होत आहे. जर तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार नसाल आणि तुमच्यावर या चढ-उताराचा परिणाम होणार नाही या विचारात तुम्ही असाल तर तुम्ही चुकत आहात. तुमच्यावर शेअर बाजाराचा काय परिणाम होईल जाणून घेऊया...2 / 7राष्ट्रीय पेन्शन योजनेचा नफा : शेअर बाजारातून मिळणाऱ्या परताव्याशी एनपीएसदेखील जोडलेले आहे. त्यातील ५० ते ५० टक्के भाग बाजारात गुंतविला जातो. त्यात घट झाली तर नफ्यावर मोठा परिणाम होतो.3 / 7रुपया कमजोर, महागाईत वाढ विदेशी गुंतवणूकदार बाजारातून बाहेर पडतात. रुपयाचे मूल्य घसरते. किमती वाढल्यामुळे महागाई वाढते.4 / 7भविष्य निर्वाह निधीवरही परिणाम : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना तिच्या वार्षिक निधीपैकी १५% हिस्सा शेअर बाजारात ईटीएफद्वारे शेअर बाजारात गुंतविते.5 / 7पीएफवरील व्याजदर हा त्यावरील कमाईवर अवलंबून असतो. जेव्हा शेअर बाजारात मोठी घसरण होते तेव्हा त्याचा परिणाम संघटनेच्या निधीवर होतो. यामुळे व्याज कमी मिळते.6 / 7अॅन्युइटी घेणाऱ्यांची पेन्शन : एनपीएस सदस्यांना निवृत्तीनंतर पेन्शन अॅन्युइटी योजना घेणे आवश्यक आहे. या कंपन्या बाजारात गुंतवणूक करतात.7 / 7बाजारातील घसरणीमुळे अॅन्युइटी फंड कमी होतो आणि त्यामुळे पेन्शनची रक्कमही कमी होते.