By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:04 IST
1 / 10२०२५ मध्ये सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला, मात्र सर्वसामान्यांसाठी ते महाग झाले. २०२६ च्या सुरुवातीला किमतीत मोठी अस्थिरता दिसून आली असून चांदीचे भाव तर उच्चांकी पातळीवरून निम्म्यावर आले आहेत.2 / 10पिवळे सोने : हे सोन्याचे सर्वात शुद्ध आणि पारंपारिक रूप आहे. पूर्वीपासून भारतीय कुटुंबांमध्ये याच सोन्याचे दागिने खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे.3 / 10कॅरेटचे गणित : पिवळे सोने २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा स्वरूपात मिळते. दागिन्यांच्या मजबुतीसाठी त्यात कॅरेटनुसार तांबे किंवा चांदी मिसळली जाते.4 / 10पिवळ्या सोन्याचे बार, बिस्किटे आणि पारंपारिक जड दागिने हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय मानले जातात.5 / 10व्हाईट गोल्ड : हल्ली तरुण पिढीमध्ये 'व्हाईट गोल्ड'ची मोठी क्रेझ आहे. हे दिसायला चांदीसारखे असले तरी ते मौल्यवान असते.6 / 10व्हाईट गोल्डची बनावट : पांढरे सोने तयार करण्यासाठी शुद्ध सोन्यामध्ये चांदी, निकेल किंवा पॅलेडियम यांसारखे पांढरे धातू मिसळले जातात. या दागिन्यांची चकाकी टिकवण्यासाठी त्यावर 'रोडियम'चे कोटिंग केले जाते.7 / 10पांढरे सोने प्रामुख्याने १४ आणि १८ कॅरेटमध्ये उपलब्ध असते. साखरपुड्याच्या अंगठ्या किंवा आधुनिक डिझाईन्ससाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.8 / 10रोज गोल्ड किंवा पिंक गोल्ड : सध्या महिलांमध्ये 'रोज गोल्ड' किंवा 'पिंक गोल्ड'चे दागिने सर्वाधिक लोकप्रिय आहेत. याला विंटेज आणि स्टायलिश लूक मिळत असल्याने याची मागणी वाढली आहे.9 / 10रोज गोल्डला गुलाबी छटा देण्यासाठी सोन्यामध्ये तांब्याचे प्रमाण अधिक राखले जाते. यामुळे दागिन्यांना एक वेगळाच 'पिंकिश' लूक मिळतो जो दिसायला अत्यंत नाजूक आणि आकर्षक असतो.10 / 10सोन्याच्या वाढत्या किमती आणि बदलत्या फॅशनमुळे आता लोक केवळ पिवळ्या सोन्यावर अवलंबून न राहता, आर्टिफिशियल ज्वेलरी किंवा रोज गोल्डसारख्या कमी कॅरेटच्या पण ट्रेंडी पर्यायांकडे वळताना दिसत आहेत.