1 / 11स्मार्टफोन हा सध्या आपल्या जिवनातील अविभाज्य भाग बनला आहे. अशा परिस्थिती अनेकांचा कल हा बजेट स्मार्टफोनकडे असल्याचं अनेकदा दिसून येतं. 2 / 11Xiaomi ही कंपनी आपल्या बजेट स्मार्टफोनसाठीही प्रसिद्ध आहे. दरम्यान, सलग १५ न्या तिमाहित Xiaomi ही भारतातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी बनली आहे. 3 / 11कंपनीनं २०२१ च्या पहिल्या तिमाहित सर्वाधिक स्मार्टफोनची शिपमेंट केली असल्याची माहिती कंपनीचे भारतातील प्रमुख आणि ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट मनू कुमार जैन यांनी दिली.4 / 11सध्या कंपनीचा भारतीय बाजारातील हिस्सा २७.२ टक्के असल्याचं IDC च्या एका रिपोर्टचा हवाला देत जैन म्हणाले. 5 / 11याशिवाय Xiaomi नं ३० लाखांपेक्षा अधिक Mi 11, Mi 11 Pro आणि Mi 11 ultra ची विक्री केली आहे. हे स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. तसंच जागतिक स्तरावार यावर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात आले.6 / 11आयडीसीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवलानुसार Xiaomi नं २०२१ च्या पहिल्या तिमाहित भारतात १०.४ दशलक्ष युनिट्सची शिपमेंट केली. यानंतर ७.३ दशलक्ष युनिट्सच्या शिपमेंटसह सॅमसंगचा क्रमांक येतो. 7 / 11सॅमसंगचा भारतीय बाजारातील हिस्सा १९ ट्क्के आहे. तर विवो आणि ओप्पो हे १७.३ आणि १२.२ टक्के बाजारातील हिस्स्यासह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. यादरम्यान रिअलमीनं (Realme) ४.१ दशलक्ष युनिट्सची विक्री केली. त्यांचा बाजारातील हिस्सा १०.७ टक्के होता. 8 / 11आयडीसीच्या रिपोर्टनुसार Mi 10i या वर्षी पहिल्या तिमाहितील सर्वात मोठं 5G मॉडेल होतं. तर Redmi 9 सीरिज मॉडेल्स भारतात शाओमीच्या एकूण मागणीच्या १० टक्के आहे. 9 / 11तर दुसरीकडे Xiaomi ने चिनी मायक्रोब्लॉगिंग साईट Weibo वर Mi 11 सीरिजच्या स्मार्टफोन्सची जागतिक पातळीवर ३० लाख युनिट्स पेक्षा अधिक विक्री झाली. 10 / 11Mi ११ मॉडेल्सच्या विक्रीचे आकजे जानेवारी आणि एप्रिल २०२१ च्या दरम्यान घेण्यात आले आहेत. यामध्ये थर्ट पार्टी रिटेलर्स सेल रेकॉर्ड आणि अन्य स्त्रोतांचाही समावेश आहे. 11 / 11Mi 11 सीरिजचा २०२१ या वर्षात केवळ तीन महिन्यांसाठी व्यवहार झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात ही सीरिज संपूर्ण जगातील बाजारपेठेसाठी लाँच करण्यात आली होती.