शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' टीव्हीच्या किंमतीत तुम्ही घेऊ शकता 1 BHK फ्लॅट! का आहे इतका खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:52 IST

1 / 7
नव्या तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टमध्ये सुधारणा होत असून, एलजी कंपनीने असा टीव्ही तयार केला आहे, ज्याच्याबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. महत्त्वाचं म्हणजे हा टीव्ही इतका महाग आहे की, तितक्या पैशात तुम्ही महानगराच्या ठिकाणी १ बीएचके तर छोट्या शहरात २ बीएचके फ्लॅट खरेदी करू शकता.
2 / 7
इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणाऱ्या एलजी कंपनीने एक असा टीव्ही तयार केला आहे, जो पारदर्शक (transparent tv) आहे. म्हणजे टीव्ही बंद असेल, तेव्हा तुम्हाला टीव्हीच्या पलीकडेचेही दिसेल. टीव्हीचे नाव एलजी सिग्नेचर ओलएलडी टी (lg signature oled t) असे आहे.
3 / 7
या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ऑडिओ आणि व्हिडीओ ट्रान्समिशन वायरलेस आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कंपनी हे मॉडेल तयार केले.
4 / 7
या टीव्हीमध्ये (lg signature oled t) नवीन अल्फा ११ एआय प्रोसेसर आहे. जो मागच्या तुलनेत ४ पट जास्त चांगला आहे. ७० टक्के ग्राफिक्स परफॉर्मन्स आणि ३० टक्के वेगवान प्रोसेसिंग स्पीड देतो. हा टीव्ही 77 इंच आहे.
5 / 7
रेझुलेशन 4K अल्ट्रा एचडी (3,840 x 2,160) आणि डॉल्बी विजन आहे. ऑब्जेक्ट (फोटो किंवा गॅलरी मोड), बार (माहिती, खेळ, बातम्या, हवामान अपडेट), होम (सेंटिग, अॅप आणि उपलब्ध सेवा) याबद्दलचे फीचर्सही आहेत.
6 / 7
टीव्हीमध्ये झिरो कनेक्ट म्हणजे अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, ज्यामुळे टीव्हीचा 4K आवाज आणि दृश्य ट्रान्समिट करतात. झिरो कनेक्टमध्ये इथरनेट, वायफाय 6E, USB 2.0, ब्लूटूथ 5.1, HDMI यांचा समावेश आहे.
7 / 7
या टीव्हीबद्दल महत्त्वाची माहिती म्हणजे या टीव्हीची विक्री सध्या अमेरिकेतच सुरू आहे. अमेरिकेत या टीव्हीची किंमत $60,000 (51,10,800) इतकी आहे. हा टीव्ही भारतात कधी लॉन्च केला जाईल, याबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.
टॅग्स :Televisionटेलिव्हिजनbusinessव्यवसायtechnologyतंत्रज्ञानInternetइंटरनेट