ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:47 IST
1 / 10इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार असेल आणि सरकार जास्त सबसिडी देईल, यासाठी थांबला असाल तर वेळ वाया घालवत आहात. कारण सध्या तरी सरकार ईव्हीवरील सबसिडीमध्ये वाढ करण्याच्या विचारात नाही. तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. 2 / 10कुमारस्वामी म्हणाले की, सरकारने ३१ जुलैपर्यंत १६ लाख ७१ हजार ६०६ ईव्हींसाठी सबसिडीच्या रूपात वाहन उत्पादक कंपन्यांना ६,६२५ कोटी दिले. अवजड उद्योग खात्याने इ-वाहन योजनेचा कालावधी दोन महिन्यांनी वाढवला होता. 3 / 10इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम १ एप्रिल २०२४ मध्ये सुरू करून ५०० कोटींचा निधी दिला. ही योजना केवळ ४ महिन्यांसाठी होती. 4 / 10जुलैमध्ये किती ईव्ही विक्री?- ५,४८४ चार चाकी, ३७६ बस, ५१,४०८ तीन चाकी, ५१,६८४ दुचाकी5 / 10सध्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री चांगली होत आहे. लोकांचा त्याकडे कल वाढल्याचे कारण मंत्र्यांनी दिले आहे. विक्री कमी झाल्यास कदाचित सबसिडी वाढविली जाऊ शकते.6 / 10मागणीत घसरण झाल्यामुळे मारुती सुझुकी व ह्युंदाई यासह प्रमुख कार उत्पादक कंपन्यांच्या घाऊक विक्रीत जुलै २०२४ मध्ये घसरण झाली आहे. कंपन्यांनी किरकोळ विक्रेत्यांना केला जाणारा वाहन पुरवठा कमी केला आहे. 7 / 10मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री ९.६४ टक्क्यांनी घसरून १,३७,४६३ वाहनांवर आली. टाटा मोटार्सच्या विक्रीत ११ टक्के घट झाली. कंपनीने ७०,१६१ वाहनांची विक्री केली. जुलै २०२३ मध्ये टाटा मोटार्सने ७८,८४४ वाहनांची विक्री केली होती.8 / 10जुलै २०२४ मध्ये दुचाकी वाहनांचा बाजार तेजीत राहिला. बजाज ऑटोची दुचाकी विक्री १८ टक्क्यांनी वाढली. कंपनीच्या २,१०,९९७ दुचाकी विकल्या गेल्या. आदल्या वर्षीच्या जुलैमध्ये हा आकडा १,७९,२६३ इतका होता.9 / 10किती कार विकल्या? मारुती सुझुकी१,३७,४६३, ह्युंदाई मोटार ४९,०१३, टाटा मोटार्स ७०,१६१-११10 / 10किती बाइक विकल्या?, बजाज ऑटो -२,१०,९९७-१८, टीव्हीएस -२,५४,२५०-८, होंडा ४,३९,११८- ४१