सर्वाधिक सोने असलेला मुस्लिम देश कोणता? ९९ टक्के लोकांना माहित नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:24 IST
1 / 6भारतात लवकरच १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख रुपयांपर्यंत पोहचू शकते. सोन्याच्या किमतींचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत असतो. स्वस्त सोनं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लगेच दुबईचं चित्र उभे राहते. मुस्लिम देशांपैकी सौदी अरेबियाकडे खूप मोठा सोन्याचा साठा असेल? असं तुम्हालाही वाटणे साहिजक आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्वाधिक सोने असलेल्या देशाचं नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.2 / 6जगात असे काही मुस्लीम देश आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने आहे. ट्रेडिंग इकॉनॉमिक्स वेबसाइटनुसार, मुस्लिम देशांमध्ये तुर्कस्तानमध्ये सर्वाधिक सोन्याचे उत्पादन होते. यामध्ये ६ असे मुस्लिम देश आहेत. जिथे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. अहवालानुसार, तुर्कीकडे ६०० टन सोने आहे.3 / 6जगातील मुस्लिम देशांपैकी तुर्कस्तानमध्ये सर्वाधिक सोने आहे. त्याचबरोबर सौदी अरेबिया आणि इराकमध्येही सोन्याचा मोठा साठा आहे. सौदीमध्ये भारताच्या तुलनेत सोने स्वस्त आहे, त्यामुळे तेथूनही सोन्याची तस्करी होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अहवालानुसार सौदीकडे ३२३ टन सोने आहे. 4 / 6मुस्लिम देशांच्या यादीत हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर इराकमध्येही मोठ्या प्रमाणात सोने आहे. हा देश अनेक दिवसांपासून युद्धसदृश परिस्थितीशी झुंजत असला तरी त्याने आपला सोन्याचा साठा अबाधित ठेवला आहे. इराकमध्ये १५३ टन सोने आहे.5 / 6सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या मुस्लिम देशांच्या यादीत इजिप्तचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. इजिप्तमध्ये १२७ टन सोने आहे. 6 / 6सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या मुस्लिम देशांच्या यादीत इजिप्तचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. इजिप्तमध्ये १२७ टन सोने आहे.