भारतातील एकमेव टॅक्स फ्री राज्य, कोट्यवधी कमावणाऱ्यांना १ रुपयाही कर भरावा लागत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:42 IST
1 / 6Tax Free State in India: जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला तुमच्या कमाईवरील टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्स भरावा लागेल. पण भारतात एक असं राज्य आहे ज्याला या नियमातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. हे भारतातील एकमेव करमुक्त राज्य आहे. इथले लोक कोट्यवधी कमावत असले तरी आयकर विभाग त्यांच्याकडून इन्कम टॅक्सच्या नावाखाली एक रुपयाही वसूल करू शकत नाही. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण.2 / 6सिक्कीम हे भारतातील करमुक्त राज्य म्हणून ओळखलं जातं. हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे राहणाऱ्या लोकांना कराच्या कक्षेतून वगळण्यात आलं आहे.3 / 6सिक्कीमच्या रहिवाशांना आयकर कायदा १९६१ च्या कलम १० (२६एएए) अंतर्गत आयकरातून सूट देण्यात आली आहे.4 / 6आयकराच्या बाबतीत सिक्कीमच्या जनतेला एवढा मोठा दिलासा का देण्यात आला आहे? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच असेल. १९७५ मध्ये सिक्कीम भारतात विलीन झाले, परंतु सिक्कीम आपला जुना कायदा आणि विशेष दर्जा कायम ठेवण्याच्या अटीवर भारतात सामील झाला, ही अट मान्य करण्यात आली. राज्यघटनेच्या कलम ३७१-एफ नुसार सिक्कीमला विशेष दर्जा आहे.5 / 6कलम १० (२६एएए) नुसार सिक्कीममधील कोणत्याही रहिवाशाचं उत्पन्न कराच्या कक्षेबाहेर असतं, मग ते सिक्युरिटी किंवा डिव्हिडंडमधून मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या व्याजातून आलं असेल.6 / 6कलम १० (२६ एएए) नुसार, भारतात विलीन होण्यापूर्वी सिक्कीममध्ये स्थायिक झालेल्या सर्वांना, त्यांचं नाव सिक्कीम विषय नियम, १९६१ च्या रजिस्टरमध्ये असो वा नसो, आयकर कायद्याच्या कलम १० (२६एएए) अंतर्गत सूट देण्यात आली आहे.