कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:15 IST
1 / 7बँकांद्वारे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कर्ज दिली जातात. यामध्ये होम लोन आणि कार लोन सारख्या अनेक कर्जांचा समावेश आहे. यापैकीच एक म्हणजे 'पर्सनल लोन'. बँकांकडून लोकांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज दिलं जातं. मात्र, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत बरेच जास्त असतात, कारण हे एक अनसिक्योर्ड लोन असतं.2 / 7जर तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळात आपल्या वैयक्तिक गरजांसाठी बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर आधी तुम्हाला विविध बँकांच्या व्याजदरांबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही अशा बँकेकडून कर्ज घेऊ शकता जिथे व्याजदर कमी असतील. आज आम्ही तुम्हाला देशातील सरकारी बँकांच्या पर्सनल लोनच्या व्याजदरांबद्दल माहिती देणार आहोत. जाणून घेऊया कोणती बँक सर्वात कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देत आहे.3 / 7SBI पर्सनल लोन: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI आपल्या ग्राहकांना १०.०५ टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदराने पर्सनल लोन ऑफर करते. हे व्याजदर तुमची पात्रता, क्रेडिट स्कोर आणि कर्जाच्या रकमेनुसार बदलू शकतात.4 / 7BOB पर्सनल लोन: बँक ऑफ बडोदा (BOB) ही देखील एक दिग्गज सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना १०.१५ टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदराने कर्ज देते. हे दर ग्राहकाच्या क्रेडिट स्कोरवर अवलंबून असतात.5 / 7कॅनरा बँक पर्सनल लोन: कॅनरा बँकेच्या व्याजदरांबद्दल बोलायचे झाले तर, ही बँक ग्राहकांना ९.९५ टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदराने पर्सनल लोन ऑफर करत आहे. हे दर पात्रता आणि क्रेडिट स्कोरनुसार बदलू शकतात.6 / 7युनियन बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन: युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ८.९० टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदराने वैयक्तिक कर्ज देते. हे दर क्रेडिट स्कोरनुसार कमी-जास्त होऊ शकतात.7 / 7PNB पर्सनल लोन: पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांना १०.६० टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदरानं पर्सनल लोन ऑफर करते. हे व्याजदर देखील तुमच्या क्रेडिट स्कोरवर आधारित असतात.