1 / 8जगातील कोणतीही पगारदार व्यक्ती घ्या, जवळपास प्रत्येकाचं एकच ध्येय असतं, एकच इच्छा असते, ती म्हणजे आपला पगार कधी वाढणार?2 / 8ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन (ओईसीडी)च्या मते याबाबतीत लक्झेम्बर्ग, अमेरिका आणि स्वित्झर्लंड येथील लोक अधिक सुखी आहेत.3 / 8कारण जगात सरासरी सर्वाधिक पगार या देशांतील लोकांना मिळतो. येथील कर्मचाऱ्यांचा सरासरी वार्षिक पगार आहे अनुक्रमे ७८,३०० डॉलर, ७७,५०० डॉलर आणि ७३,००० डॉलर!4 / 8हा पगार रुपयांमध्ये सांगायचा झाला तर लक्झेंबर्ग देशातील नागरिकांना ६७ लाख ९ हजार ३२१ रुपये इतका पगार मिळतो. 5 / 8अमेरिकेतली लोकांना ६६ लाख चाळीस हजार ७७१ रुपये इतका पगार मिळतो. 6 / 8सर्वाधिक पगार मिळत असलेल्या लोकांच्या टॉप १० देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे बेल्जियम (६४,८०० डॉलर), तर पाचव्या क्रमांकावर आहे, डेन्मार्क (६४,१००) डॉलर.7 / 8सहाव्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रिया (६३,८०० डॉलर), सातव्या क्रमांकावर आहे नेदरलॅण्ड्स (६३,२०० डॉलर).8 / 8आठव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया (५९,४०० डॉलर), नवव्या क्रमांकावर कॅनडा (५९००० डॉलर) आणि दहाव्या क्रमांकावर जर्मनी (५८,९०० डॉलर).