By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 14:57 IST
1 / 15व्होडाफोन-आयडियानं बुधवारी काही नव्या प्लॅन्सची घोषणा केली. या अंतर्गत ग्राहकांना मोठे लाभ देण्यात येणार आहेत.2 / 15अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दूरसंचार कंपन्यांच्या शर्यतीत अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवण्यासाठी काही ना काही नवं देण्याचा प्रयत्न करत आहेत.3 / 15४०१ रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शन दिलं जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलं. 4 / 15ही सुविधा ग्राहकांना ४०१ रूपये, ६०१ रूपये, ८०१ रूपये आणि ५०१ रूपयांचं रिचार्ज करणाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. 5 / 15तर ४९९ किंवा त्यापेक्षा अधिक रूपयांचं रिचार्ज करणाऱ्या पोस्टपेड ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 6 / 15व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांसाठी भारतातील सर्वात मोठ्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स पैकी एक Disney+ Hotstar यांच्या हाय क्वालिटी एन्टरटेन्मेंटसाठी आणि एका वर्षाच्या क्रिकेट सामन्यांसाठी करार केला असल्याची माहिती कंपनीनं दिली7 / 15 भारतातील ग्राहकांना बेस्ट कंटेन्ट उपलब्ध करुन देणं जे मनोरंजनापासून क्रिकेटसारख्या लोकप्रिय कॅटेगरीपर्यंत असेल, असंही कंपनीनं नमूद केलं. 8 / 15 व्होडाफोन आयडिया या कंपनीनं यापूर्वीपासूनच काही ठराविक ग्राहकांसाठी अॅमोझॉन प्राईम, नेटफ्लिक्ससारखं सबस्क्रिप्शन दिलं आहे. 9 / 15या वर्षी क्रिकेटच्या अॅक्शनसह हाय क्वालिटी, उत्तम कंटेन्ट जे Disney+ Hotstar ऑफर करते ते पूर्ण वर्षासाठी व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना ऑफर करून आम्हाला आनंद झाल्याची प्रतिक्रिया Disney+ Hotstar चे ईव्हीपी प्राभ सिमरन सिंग यांनी दिली. 10 / 15४०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते. तसंच यात अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. 11 / 15तसंच ५०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि ७५ जीबी डेटा देण्यात येणार आहे. 12 / 15 तर ६०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, दररोज ३ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. 13 / 15याशिवाय कंपनी ३२ जीबी अतिरिक्त डेटाही देत आहे. त्यामुळे एकूण २०० जीबी डेटा देण्यात येतो. 14 / 15जे ग्राहक ८०१ रूपयांचं रिचार्ज करतील त्यांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, रोज ३ जीबी डेटा आणि ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. 15 / 15तसंच यामध्ये ४८ जीबी अतिरिक्त डेटा देण्यात येईल. त्यानुसार एकूण ३०० जीबी डेटा देण्यात येणार आहे.